परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मुस्लिम समाज चे तबलीक जमात चे धर्मांचा धार्मिक दोन दिवसीय इज्तेमा होणार ..
दि.19 व 20 नोव्हेंबर रोजी नेमगीरी परिसरातील शमशोद्दीन मैदान वर आयोजित.
जिंतूर /प्रतीनीधी/माबूद खान/परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मुस्लिम समाज चे तबलीक जमात चे धर्मांचा धार्मिक दोन दिवसीय इज्तेमा आयोजन करण्यात आले आहे
शहरात मुस्लिम समाजाचा तबलीक जमात चे धार्मिक सोहळा दोन दिवसीय इज्तेमा दि.19 व 20 नोव्हेंबर रोजी नेमगीरी परिसरातील शमशोद्दीन मैदान वर आयोजित करण्यात आले आहे त्यामुळे या परिसरात तीस ते पस्तीस हजार मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्याने भव्य इज्तेमा मंडप,रस्ता,विज,जेवनाचे चार झोन,पाणी पिण्यासाठी चार झोन,वजूखाने, शौचालयसह इतर विविध कामांसाठी मागील 15 दिवसांपासून मुस्लिम समाज बांधवांनी दिवसरात्र काम युध्दपातळीवर सुरू आहे.या
इज्तेमा साठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे…दोन दिवसीय इज्तेमा साठी पुणे, मुंबई येथील मुस्लिम मौलवी (धर्मगुरू) पवित्र कुराणा,व प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या सांगीतलेल्या उपदेश करणार आहे
हा इज्तेमा फक्त धार्मिक असल्याने सर्व मुस्लिम धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आयोजक मुफ्ती कलीम बेग मिर्झा यांनी सांगितले आहे.