कामगारांच्या व मजुरांच्या प्रश्नाबाबत शिवसेना नेहमी ठामपणे उभी राहणार— अनिल दादा जगताप..
कामगारांच्या श्रमामुळे आपला महाराष्ट्र घडला
शासनाच्या सर्व योजना कामगारा पर्यंत पोहोचवण्याची महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना ही संस्था ही शासन व कामगार मजूर यांच्या मधील दुवा ठरणार – : लोकपत्रकार भागवत तावरे.
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आयोजित महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने नोंदणी करत कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचा कार्यक्रम दिनांक 15 -11 -2023 रोजी जय हिंद साॅ मिल सुभाष रोड बीड येथे शेख निजाम शिवसेना बीड यांच्या अध्यक्षतेखाली व मा अनिल दादा जगताप जिल्हाप्रमुख शिवसेना बीड यांच्या शुभहस्ते वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता यावेळी शिवसेना अनिल दादा जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की शिवसेना पक्ष व मी स्वतः कामगारांच्या प्रश्नाविषयी नेहमी जागरूक राहिलेलो आहे त्यामुळे जेव्हा कधी कामगार व मजुरांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास यावेळी मी स्वतः व शिवसेना पक्ष खंबीरपणे कामगार मजुरांच्या पाठीमागे उभा राहणार आहे
संघटनेच्या सुरक्षा संच वाटप कार्यक्रम यामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना लोकपत्रकार भागवत तावरे यांनी म्हटले की कामगार व मजुरांच्या जीवावर अनेक मोठमोठ्या इमारती व संकुले उभी राहिलेली आहेत परंतु आजपर्यंत मजुरांना कामगारांना हवे तसे जीवनमान उंचावलेले दिसत नाहीत त्यांच्या प्रश्नांवर आजपर्यंत कोणी जास्त लक्ष दिलेले नाही
शासनाच्या असलेल्या अनेक योजना ह्या कष्टकरी मजुरांच्या कामगारांच्या पर्यंत पोहोचत नाहीत हीच खरी व्यवस्थेची शोकांतिका आहे कामगार चळवळीने आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक मोठमोठे नेते दिले परंतु सर्वसामान्य मजूर व कामगारांच्या आयुष्यामध्ये कोणताही मोठा बदल घडलेला नाही आपला भारत देश व महाराष्ट्र हा कष्टकरी कामगार व मजुरांच्या श्रमामुळेच घडलेला आहे व महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना ही शासनाच्या वेगवेगळ्या योजना ह्या शासन व कामगार मजूर यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा सेतू ठरेल असे मत लोकपत्रकार भागवत तावरे मांडले
तसेच डाॅ.बाबुजी जोगदंड यांनी संघटनात्मक कार्यात मदत करू व शासन दरबारी सहकार्य करू व कामगार कल्याणासाठी सदैव संघटने सोबत राहीन असे म्हटले
यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये शेख निजाम यांनी संस्थेच्या एकंदरीत कार्याला शुभेच्छा देऊन सर्व कामगारांना शासनामार्फत मिळणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ कसा देता येईल व याबाबत कसे काम करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व संघटनेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या
सदरील कार्यक्रमांमध्ये संघटनेचे मार्गदर्शक हाजी जैनुद्दीन शेठ माजी उपनगराध्यक्ष सय्यद मोईनुद्दीन मास्टर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शामराव पडोळे , लक्ष्मण दादा ढवळे, कुर्ला ग्रामपंचायतचे सरपंच संदीप पाटील, नगरसेवक हाफिज अशपाक ,खय्युम इनामदार, पाशा सेट, आधी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख अमर जैनुद्दीन व जिल्हाध्यक्ष शेख नसीर यांनी केले यावेळी अनेक कामगार मजूर यावेळी उपस्थित होते