सिटीजनचे उपसंपादक शेख तालेब यांना पितृशोक..
बीड /प्रतिनिधी/ बीड येथील सा. दैनिक बीड सिटीझन चे उपसंपादक शेख तालेब यांचे वडील तथा जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त चालक शेख अब्दुल बासेद सहाब यांचे शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समय ते 80 वर्षाचे होते शनिवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता नमाज जनाझा तकीया मज्जिद कबरस्तान येथे होनार आहे व त्यांची दफन विधी तेथे करण्यात येणार आहे.
बीड शहरातील शहेनशा नगर येथील अब्दुल बासीद हे एक चांगले मनमिळावृतीचे व लोकांच्या अडीअडचणी मध्ये धावून जाणारे अनेकाला सहकार्य करणारे व्यक्तिमत्त्वाचे होते गेल्या काही दिवसापासून आजारी होते त्यांच्यावर खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालय उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी चार मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे शेख कुटुंबियांच्या दुःखात “पठाण ऐ हिंद” मराठी वृत्तपत्र व “हिंद न्यूज” नेटवर्क परिवार सहभागी आहे