सचिन धसची अंडर 19 भारतीय संघात निवड बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने केले अभिनंदन..
बी सी सीआयने अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा..
बीड/प्रतिनिधी/ बीड दि.25 : बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा फलंदाज सचिन धसची आशिया करंडकसाठी अंडर-19 या भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात 8 डिसेंबरपासून युएई येथे होणार आहे. त्याच्या यशाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने अभिनंदन केले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बी सी सीआयने अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा केली आहे. यामध्ये जिल्ह्याचा सुपूत्र सचिन धस याची निवड झाली असून भारतीय क्रिकेट संघात निवड झालेला सचिन धस हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. सचिनला क्रिडा प्रशिक्षक अजहर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.