अंजुमन इशात ए तालीम, बीड चे कार्यकारी मंडळाचा मोठा निर्णय .

मिल्लिया मुलींचे शाळेतील प्रशासन व व्यवस्थापन महिला शिक्षकांकडे- सचिव श्रीमती खान सबिहा बेगम..

बीड/प्रतिनिधी/ अंजुमन इशात ए तालीम, बीड चे कार्यकारी मंडळाने असा निर्णय घेतला आहे की, मिल्लिया मुलींची माध्यमिक शाळा, बीड येथील मुख्यध्यापक, उपमुख्यध्यापक व इतर शिक्षकांचे कार्य व सर्व व्यवस्थापन, प्रशासन व कामकाज आज पासून महिला कर्मचारी यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले
श्रीमती सिद्दिकी हुमेरा कौसर भ्र. डॉ. सय्यद हामेद अली या प्रभारी मुख्यध्यापक म्हणुन कामकाज पाहतील तसेच मिल्लिया मुलींची शाळेतील सर्व पुरुष शिक्षक यांना संस्थेच्या इतर शाळेमध्ये रुजु करण्यात आले आहे.
शाळेच्या परिसरामध्ये शाळेच्या वेळेमध्ये कोणत्याही पुरुष व मुलांना प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शाळेच्या वेळे नंतर महिला पालक शिक्षकांना भेटून आपल्या पाल्यांची शैक्षणिक माहिती घेऊ शकतात तसेच पालक काही सुचनापण देऊ शकतात. शाळेचे अध्यापनाचे कार्य सुरळीत सुरु झाले असून विद्यार्थीनींची संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे.
पालकांनी आपल्या मुलींना शाळेत वेळेवर पाठवावे व शैक्षणिक नुकसान टाळावे असे संस्थेच्या सचिव श्रीमती खान सबिहा बेगम, संस्थेचे संचालक डॉ. शेख समीर यांनी याद्वारे आव्हान केले आहे.