दारुल उलूम बीडचा 60 वा वार्षिक सम्मेलन व सम्मान सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-: मुफ्ती जावेद साहेब.
हजरत मौलाना मुहम्मद सलमान बिजनोरी यांचे होणार आगमन व मार्गदर्शन..
पूर्वी शिकून झालेले मुफ्ती ,अलीम, हाफिस, शिक्षकांचे हजार लोकांचे होणार सन्मान..
बीड/ प्रतिनिधी/. 11 डिसेंबर : बीड शहरातील तेलगू नाका येथील.”मदरसा दारुल उलूम बीड”
गेल्या 60 वर्षांपासून धार्मिक आणि शैक्षणिक सेवा देणाऱ्या मराठवाड्यातील प्रसिद्ध मदरसा दारुल उलूम बीडचा 60 वा वार्षिक सम्मेलन व सम्मान सोहळा 2 जुमादल उखरा 1445 हि. मु.१६ डिसेंबर २०२३ ई. शनिवार रोजी मदरसा दारुल उलूम बीड, शाह अबरारुल हक कॉलोनी, तेलगाव रोड, बीड आयोजित होणार आहे.
ज्या मध्ये ६० वर्षांच्या कालावधीत मदरसातून (शाळेतून) हुप्फाज उलमा व अइम्मा, यांचा सन्मान हकीमुल इस्लाम यांचे नातु व खतीबुल इस्लाम यांचे उत्तराधिकारी, हजरत मौलाना मुहम्मद सुफयान साहेब कासमी (कुलगुरू: दारुल उलूम (वक्फ) देवबंद तसेच पीर ए तरीकत हजरत मौलाना मुहम्मद सलमान साहेब बिजनोरी (उस्ताजे हदीस व अदब दारुल उलूम देवबंद व खलीफ-ए-अजल मेहबूबे उलमा व सुल्हा हजरत मौलाना पीर सैय्यद जुल्फिकार साहेब नक्शबंदी यांच्या हस्ते अमलात येईल.