डॉ.अशोक बडेंनी. जिल्ह्याची आरोग्यसेवा सुपरफास्ट साठी सर्वच एमएसचा घेतला आठ तास आढावा; दर्जेदार रुग्णसेवेसाठी तत्पर राहण्याचे दिले कानमंत्र.

0
109

सीएस बडेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची आरोग्यसेवा सुपरफास्ट

 

सर्वच एमएसचा घेतला आठ तास आढावा; दर्जेदार रुग्णसेवेसाठी तत्पर राहण्याचे दिले 

कानमंत्र..


बीड, दि.13 ः- जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय आरोग्यसेवेमध्ये वेळेत आणि दर्जेदार रुग्णसेवा मिळवून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडेंनी यंत्रणा तरतरित करत जिल्ह्यातील संपूर्ण एमएसची बैठक बोलावून सहा तास आढावा घेतला. यावेळी प्रत्येक रुग्णांना आपल्यास्तरावरच आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल राहण्याचेही सांगितल्याने सीएस बडेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची आरोग्यसेवा सुपरफास्ट झाली आहे.

रुग्णालयात आलेला रुग्णांला वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळाली तर रुग्ण समाधान राहू शकतो. यासाठी डाक्टारांबरोबच कर्मचार्‍यांनाही तन-मनाने काम करावे लागले. ज्या त्या ठिकाणीच अनेक सोयी सुविधा दिल्या तर सिव्हीलवरील येणार अतिरिक्त भार कमी होवू शकतो. तसेच रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना उपचारसेवेत कमतरता करू नये त्याचबरोबर सर्व अधिकारी कर्मचार्‍यांनी आपल्या कर्तव्यावर वेळेत यावे आणि आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच कुणी कामचुकारपणा करत असले तर त्यास एकदा समस देवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे. रुग्णालयातील स्वच्छतेबाबतही सुचना करण्यात आल्या यावेळी अनेक वैद्यकीय अधिकार्‍यांकडून काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यावर सीए बडेंकडून तोडगा काढत आरोग्यसेवेसाठी कायम दक्ष राहून काम करत असल्याचे दाखवून दिले. विविध कामाच्या पद्धतीबरोबर त्यांना दिलेल्या कानमंत्रामुळे जिल्हाची आरोग्यसेवा तरतरित होवून रुग्णसेवा सुपरफास्ट होणार असल्याचे दिसून येते.

जिल्हाशल्यचिकित्स डॉ.अशोक बडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला बाह्यरुग्ण वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत तांदळे, डॉ.हनुमंत पारखे, नेकनूर स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.गित्ते, नेकनूर स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.हुबेकर, परळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.गुट्टे, माजलगाव वैद्यकीय अधीक्षक डॉ.कट्टे, पाटोदा वैद्यकीय अधीक्षक डॉ.राऊत, धानोरा वैद्यकीय अधीक्षक डॉ.ढवळे, केज वैद्यकीय अधीक्षक डॉ.केंद्रे, तालखेड वैद्यकीय अधिकारी डॉ.पंडीत, गेवराई वैद्यकीय अधीक्षक डॉ.नोमानी, आष्टी वैद्यकीय अधीक्षक डॉ.टेकाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

रेफरवर लागणार बे्रक
अनेक रुग्णालयात उपचार होत असतांनाही काही वैद्यकीय अधीकार्‍यांकडून कामचुकारपणा करत सर्रासपणे रुग्ण रेफर केले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडेंनी आढावा घेवून कामावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर विनाकारण एकही रुग्ण रेफर झाला नाही पाहिजे याचेही तंबी देण्यात आली. यामुळे ज्या त्या ठिकाणीच उत्तम आणि दर्जेदार रुग्णसेवा 

 

प्रत्येक महिन्याला घेणार आढावा
प्रत्येक वैद्यकीय अधीक्षकांना आप आपल्या सेंटर मध्ये रुग्णसेवेबरोबर शस्त्रक्रियाचेही प्रमाण वाढण्याचे सांगितले केले असून यापुढे ज्या त्या ठिकाणीच अनेक आजारावरिल शस्त्रक्रिया होणार असून दर महिन्याला प्रत्येक उप जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांचा आढावा घेतला जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडेंनी म्हटले आहे.

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here