आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीला अटक करण्यात आली आहे. वाय एस शर्मिला असे त्यांचे नाव आहे. तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात वाय एस शर्मिला यांचे समर्थक आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या ( टीआरएस ) कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी वाय एस शर्मिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. वाय एस शर्मिला यांचा वाय एस आर तेलंगणा पक्ष आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून त्यांनी तेलंगणात पद यात्रा काढली आहे. आतापर्यंत शर्मिला यांच्या पदयात्रेने ३ हजार ५०० किलोमीटरचे अंतर पार केलं आहे. त्यात काल ( २७ नोव्हेंबर ) शर्मिला या वारंगल जिल्ह्यातील नरसांपेत होत्या. तेव्हा जनतेला संबोधित करताना शर्मिला यांनी स्थानिक टीआरएस आमदार पेड्डी सुदर्शन रेड्डी यांच्यावर टीका केली य एस शर्मिला यांनी केलेल्या टीकेनंतर टीआरएसचे कार्यकर्ते संतप्त झाले. टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी वाय एस शर्मिला यांच्या पदयात्रेतील वाहनांवर हल्ला करत जाळपोळ केली. यानंतर शर्मिला यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि टीआरएसच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांची झटापट झाली.