Home बीड परळी परळी शहरातील भीम नगर येथील बुद्ध विहाराचं बांधकाम केव्हा होणार. प्रेम जगतकर....
परळी शहरातील भीम नगर येथील बुद्ध विहाराचं बांधकाम केव्हा होणार. प्रेम जगतकर.
परळी, प्रतिनिधी = परळी शहरातील भीम नगर येथील नियोजित बुद्ध विहाराचे बांधकाम केव्हा होणार अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर येथे गेल्या तीन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करून माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार यांनी दलितांच्या मतावर डोळा ठेवून थाटात उद्घाटन केले त्याला आज तीन वर्षे होताना दिसत आहे तरीपण या कामाचे साधे मोजमाप किंवा काम झालेले नसून फक्त येणाऱ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर डोळा ठेवून व दलितांचे मतदान घेण्यासाठी फक्त हा विटा आटापिटा असून त्याचाच एक भाग म्हणून पांगरी येथील नियोजित बुद्ध विहाराचे उद्घाटन होत आहे की काय असेही प्रसिद्धीपत्रक म्हटले आहे परळी शहरातील नियोजित बुद्ध विहारा च्या जागेची कशी दुर्दशा झाली आहे ते प्रत्यक्ष दर्शनी छायाचित्रही आम्ही प्रकाशित करीत आहोत तरी भीम नगर येथील ही नियोजित बौद्ध विहाराचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावेत अन्यथा लवकरच जन आंदोलन करण्यात येईल असाही इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिला आहे