शिक्षकांसोबत खाजगी शिक्षण संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात -:
प्रकाश सोळंके
परतुर-जालना/…प्रतिनिधी शिक्षकांसोबत खाजगी शिक्षण संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात.
प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष
दिनांक.१२ डिसेंबर २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी परतुर यांच्या मार्फत मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करुण सोळंके पुढे म्हणाले मराठवाड्यातील शिक्षकांच्या परीक्षा सोबत खाजगी शिक्षण संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षा घेण्या मराठवाड्यातील शिक्षक कशा पद्धतीने देशाचा पाया निर्माण करतात म्हणून शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिनंदन, मराठवाड्यातील शिक्षकांच्या गुणवत्ता तपासण्यासाठी परीक्षा घेण्यासोबतच मराठवाड्यातील खाजगी शिक्षण संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षा घेणे आवश्यक आहे,
कारण खाजगी शिक्षण संस्थेतील इतर कर्मचारी सगळ्याच लोकांना कशा पद्धतीने काम करतात त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, का एकच कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांचे काम करतो अशा पद्धतीने काही संस्थेत काम चालू आहे का? याची तपासणीमध्ये खूप महत्त्वाचे आहे, आत्तापर्यंत मागच्या पिढ्या बरबाद झाली असतील त्याला कोण जबाबदार आहे हा तर्क वितर्क लावण्यात अर्थ नाही परंतु यानंतर भविष्यातील येणाऱ्या पिढ्या शिक्षणापासून वंचित राहून बरबाद होऊ नये म्हणून खाजगी शिक्षण संस्थेतील सगळ्या कर्मचाऱ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी मराठवाड्यातील होणाऱ्या शिक्षकांच्या परीक्षा सोबत खाजगी शिक्षण संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षा घेणे आवश्यक आहे
शिक्षकांसोबतच इतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षा होतील ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे मराठवाड्यातील जिल्हा परिषद व खाजगी शिक्षण संस्थेतील ६० हजार शिक्षकांच्या गुणवत्ता तपासण्यासाठी परीक्षा सोबतच खाजगी शिक्षण संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांना अक्षर ओळख आहे किंवा नाही याची तपासणी व्हावी म्हणून शिक्षकाच्या परीक्षांसोबतच इतर कर्मचाऱ्यांच्या सुद्धा परीक्षा घ्याव्यात अशी मागणी सोळंके यांनी केली आहे…