बीड दि.१३ (प्रतिनिधी):- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत टप्पा क्र.०२ मधील पेठ बीड भागातील जुन्या मोंढ्यामधील अंतर्गत सिमेंट रस्ते व नाली बांधकाम सुरू आहे. मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली.
माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान योजने अंतर्गत बीड नगर परिषदेच्या माध्यमातून जुना मोंढा भागातील सिमेंट रस्ता कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्ता व नाली काम पूर्ण झाले असून मंगळवारी मा.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नी या रस्ता आणि नाली कामाची पाहणी केली.
शहराच्या व्यापारी केंद्राच्या दृष्टीने जुना मोंढा हा भाग अत्यंत महत्वाचा मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा व सामान्य नागरिकांची सतत वर्दळ असल्याने रस्त्याचे काम व्यापारी बांधवांशी चर्चा करून सुरू करण्यात आले होते. या झालेल्या आणि होत असलेल्या दर्जेदार कामामुळे व्यापारी बांधव व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी रस्ता व नालीचे काम दर्जेदार करण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचारी, गुत्तेदार यांना योग्य त्या सूचना केल्या. तसेच रस्ता, नालीचे कामे योग्य पद्धतीने आणि दर्जेदार करून घेण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी स्थानिक व्यापारी बांधवांनी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे दर्जेदार सिमेंट रस्ते आणि नाली यासह इतर विकास कामे केल्याबद्दल पुष्पगुच्छ व शाल देऊन आभार मानले.
यावेळी मोंढा व्यापारी युनियन चे अध्यक्ष जवाहरलाल कांकरिया, अशोक शेटे, मदनलाल अग्रवाल, फारुक पटेल, अमर नाईकवाडे, गणेश वाघमारे, संजय नहार, फामजी पारीख, लक्ष्मण शेनकुडे, ईश्वर धनवे, सतपाल लाहोट, भागवत बादाडे, विशाल मोरे, बंडू निसर्गन, ज्ञानेश्वर बनसोडे, लाला बनसोडे, आण्णासाहेब भालेराव यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.