धर्माच्या बाबतीत कोणतीही बळजबरी इस्लामला मान्य नाही -: लेखक – अर्शद शेख

0
129

 * लव्ह जिहाद *

धर्माच्या बाबतीत कोणतीही बळजबरी इस्लामला मान्य नाही -: लेखक – अर्शद शेख

 

धर्माच्या बाबतीत कोणतीही बळजबरी इस्लामला मान्य नाही, कोणतीही आमिषे, बक्षिसे प्रलोभन किंवा दबाव धर्मांतराचे कारण असूच शकत नाही. त्याच प्रमाणे कोणा निरागस मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरण करणे इस्लामच्या दृष्टीने फक्त निषिद्धच नसून महापाप आहे.

 

इस्लाम लग्नापूर्वी मुला मुलींच्या प्रत्येक संबंधास विरोध करतो. लग्ना अगोदर मुला – मुलींना एकमेकांस पाहून आपली संमती देणे अपेक्षित आहे. परंतु लग्नाअगोदर अगदी नियोजित वर-वधुंचे संबंध देखील इस्लामला मान्य नाही. लग्नाअगोदर प्रेम हा इस्लामच्या दृष्टीने व्याभिचार आहे आणि व्याभिचार महापाप आहे. अशा एकूण परिस्थितीत हे अनैतिक कृत्य धर्माच्या दृष्टीने सत्कार्य कसे होऊ शकते? अनैतिक कृत्याने कोणी धार्मिक होऊ शकत नाही.

 

सामाजिक सहजीवनात मुलगा आणि मुलीची जवळीक झाल्यास त्याचे रूपांतर प्रेमात आणि लग्नात होऊ शकते. हा पूर्णपणे वैयक्तिक विषय आहे. त्याला धर्माशी जोडणे अतार्किक आहे. सध्या व्यक्ती विशेषच्या प्रत्येक कृत्यास धार्मिक रंग देऊन इस्लामला बदनाम करण्याची जणू ‘फॅशन’च सुरू झालेली आहे. वास्तविक पाहता व्यक्तीची धर्मांधता ही धर्माच्या शिकवणी नसून धर्माचे पालन न केल्यामुळे आहे. कोणतीही अनैतिकता इस्लामला मुळीच मान्य नाही. किंबहुना नैतिकतेशिवाय इस्लाम नाही. इस्लामचे तत्त्वज्ञान नैतिकतेवर आधारीत आहे. त्याला आपल्या धर्माच्या प्रचारासाठी अशा दुबळ्या युक्त्या प्रयुक्त्या करण्याची काहीच आवश्यकता नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here