एआय एमआय एम पक्षाच्या सिरसाळा येथील जाहीर सभेत लोटला जनसागर..
राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याचा जाहीर प्रवेश; संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा !
एआय एमआय एम जिंदाबाद, शफीक भाऊ जिंदाबाद च्या नाऱ्यांनी दुमदुमला सिरसाळा..
सिरसाळा (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊ यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत अक्षरशः जनसागर लोटला आणि एआयएमआयएम पक्ष जिंदाबाद, शफिक भाऊ जिंदाबादच्या नाऱ्यांनी सिरसाळा गाव दणाणले. याच जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्याने पक्षात प्रवेश केला तर संभाजी ब्रिगेडने पक्षाच्या लोककल्याण पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.
राष्ट्रवादी नेत्यांचा पक्षात प्रवेश तर संभाजी ब्रिगेड चा जाहीर पाठिंबा
जाहीर सभेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशपाक सेठ यांनी एआयएमआयएम पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा जिल्हाध्यक्ष शफिक भाऊंनी सत्कार केला तसेच संभाजी ब्रिगेड ने एआयएमआयएम पक्षाच्या लोक कल्याण पॅनलच्या सरपंच पदासह सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.
ब्रिगेडच्या पाठिंबाचे स्वागत करून आभार व्यक्त केले.
एआयएमआयएम पक्षाने सिरसाळा ग्रामपंचायत निवडणूकीसाठी लोक कल्याण पॅनल चे सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ दि. १४ डिसेंबर बुधवार रोजी जाहीर सभा घेतली. पॅनल कडून सरपंच पदासह सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करण्यात आले. गावाच्या विकासासाठी सिरसाळा ग्रामस्थांनी आजपर्यंत अनेकांना संधी देऊन पाहिली आहे परंतु मोठ्या अपेक्षेने व आशेने ग्रामस्थांनी निवडून दिलेल्यांनी फक्त स्वतःचा विकास साधून घेतला व गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने सिरसाळा गावाचा म्हणावा त्याप्रमाणे विकास झाला नाही. आपण सर्वांनी आजपर्यंत अनेक पक्षांना व उमेदवारांना संधी देऊन पाहिली मात्र आता वेळ आली आहे ती स्वतःचा नव्हे तर गावाचा विकास करण्याची आणि गावाचा खरा विकास एआयएमआयएम पक्षाला संधी दिल्यास निश्चितपणे आपल्या गावाचा विकास करून दाखवू यासाठी यावेळी विकास करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाच्या लोक कल्याण पॅनल चे सरपंच पदाच्या उमेदवारासह सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून सिरसाळा गावाचा विकास करण्याची संधी द्यावी असे मनोगत अॅड. शेख शफीक भाऊ यांनी सभेच्या व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केले.तसेच रमीज सर, शरीफ भाई, जमील अध्यक्ष, युसुफ भाई, लुगडे महाराज, जाधव साहेब, अश्फाक सेठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन कादर कुरेशी यांनी केले.जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी परळी व सिरसाळा टीम ने परिश्रम घेतले.