AIMIM बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमीज यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा सामाजिक कार्यकर्ता: रेहान जागीरदार
बदनाम करण्यासाठी स्थानिक नेत्यांचा षड्यंत्र
अंबाजोगाई प्रतिनिधी -शेख फेरोज
स्थानिक नेते वरिष्ठ नेत्यांनी मिळुन AIMIM बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमीज यांना बदनाम करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचं षड्यंत्र असा आरोप रेहान जागीरदार यांनी केला आहे.
दिनांक ११ डिसेंबर रोजी शहरातील पंचायत समिती समोर आठ ते दहा समाज कंठकांनी परळीहुन अंबाजोगाई मार्गे उस्मानाबाद जाणाऱ्या लग्नाची ट्रॅव्हल्सला तोडफोड करुन ड्रायव्हर आणि मुस्लिम समुदायातील महिलांना शिवीगाळ, मारहाण केल्यामुळे ड्रायव्हर यांनी ट्रॅव्हल्सला शहर पोलीस स्टेशनला आणली या घटनेची माहिती मिळताचAIMIM बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमीज यांनी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला धाव घेवुन ड्रायव्हरला न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेऊन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या,समाज कंटकांवर रात्री उशिरा कायदेशीर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.