अनवा जळगाव सपकाळ. परिसरा मध्ये रेती माफीया ची  रेतीची चोरटी तस्करी..

0
138

अनवा जळगाव सपकाळ. परिसरा मध्ये रेती माफीया ची  रेतीची चोरटी तस्करी..

महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी टिप्पर वर कारवाई करण्यात यावी  मागणी..

अनिस शेख // भोकरदन तालुक्यातील परिसरामध्ये रेतीमापिया यांचे टिप्पर खेड्यापाड्यातून भरधाव वेगाने चालवून छोट्या-मोठ्या गाड्यांना धोके निर्माण झाले आहे. कारण रेती माफीया वाळूचे टिप्पर वेगाने जीवाची परवा न करता चालवताना दिसत आहे
दुसऱ्याची जीवनाची परवा न करता वेगाने रेती माफिया टिप्पर चालवत असून दिवसभरातून दहा-पंधरा टिप्पर अनवा जळगाव सपकाळ. कोदा.हिसोडा. पिपळगाव. वाकडी कल्याणी.करजगाव.आडगाव भोबे व इतर परिसरामध्ये चोरटी रेतीची वाहतूक करताना दिसत आहे .

तरी महसूल प्रशासन डोळे झाक करीत आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे. टिप्पर मुळे रस्त्यावरील तसेच टिप्पर चे ड्रायव्हर यांचे उद्धटपणे वागणूक गाड्यांना साईड न देणे. भरधाव वेगाने टिप्पर चालवणे. यांच्यापासून एक्सीडेंट होण्यास कारणीभूत ठरू शकतात. तरी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी टिप्पर वर कारवाई करण्यात यावी असे नागरिकांची मागणी होत आहे .

तसेच गावातील तलाठी अधिकारी महसूल विभागाचे कर्मचारी यांना फोन करून सुद्धा कारवाई करत नाही यावरून असे सिद्ध होते .की रेती माफिया व यांचे लागेबांधे असल्याचे सर्वसामान्य जनतेतून चर्चेत येत आहे. संबंधित महसुली विभागाचे अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर कारवाई का करत नाही हा सवाल निर्माण होत आहे .कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता टिप्पर रेती माफिया आहे दररोज सकाळी चार वाजेपासून संध्याकाळपर्यंत आठ ते दहा गाड्या विना नंबर प्लेट रेतीची वाहतूक करताना दिसत आहे. चोरटी रेती वाहतूक करणारे ही शासनाची महसूल बुडून लाखो रुपयाची उलाढाल हे रेती तस्करी करणारे करत आहे.

तरी असेच एका टिप्पर वाल्याची मुलाखत घेतली असता त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे देत सर्वांना मिली भगत असल्याचे त्याच्या बोलण्यावरून कळाले. महसूल प्रशासन यांनी अवैध्य रेती वाहतूक क कारवाई करण्यात यावी असे नागरिकांची मागणी होत आहे .


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here