बीड दि.15 (प्रतिनिधी) – मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पेठ बीड भागातील पोलीस स्टेशन इदगाह नाका ते नाळवंडी नाका आणि नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी, सारडा जिनींग या सिमेंट रस्ते व नाली कामाच्या बांधकामाची पाहणी केली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा क्रमांक दोन ची कामे शहरात सुरू आहेत. माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि मा. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.गुरूवारी पेठ बीड पोलीस स्टेशन ते इदगाह, नाळवंडी नाका, तसेच नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी सिमेंट रस्ता व नाली बांधकामाची पाहणी केली.
याप्रसंगी डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, बीड शहरात सुरू असलेले कामे हे दर्जेदार स्वरूपाचेच व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यानुसार आम्ही स्वतः पडताळणी करतो. शहराच्या विकासाबाबत भूमिका मांडून शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.बीड शहराच्या विकासात भर घालणारी विकास कामे करतांना दर्जेदार असली पाहिजेत, परंतू ती वेळेत पूर्ण करावीत, असे डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, गुत्तेदार यांना रस्त्याचे आणि नाल्यांचे काम दर्जेदार करण्यासंदर्भात सूचना केल्या.
यावेळी अमृत सारडा, सादेकभाई जमा,आसाराम गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ, गणेश वाघमारे, सय्यद इलियास भाई, अमोल पौळ, भागवत बादाडे, बंडू निसर्गन, संगीताताई वाघमारे,ओमप्रकाश तोतला, सतिष जाधव, विपुल गायकवाड, राम इगडे, सचिन चव्हाण,सतिष जाधव,राम जाधव, आकाश मुपडे,विकास यादव, संतोष जाधव उपस्थित होते.