” मुस्लिम ” नावाचा शब्द आला रे आला कि तो नकारात्मक ‘हीन’ भावना असलेला तो “विलेन” ठरवला जातो -: मोहसीन खान.
मुसलमान’ सर्व स्तरातून हा
” विलेनच ” !
देशात’सनी लिओनी’ नाकावर टिचून काम करते कोणाच्याच ‘भावना’दुखत नाहीत ?
लातूर /प्रतिनिधी/ फिल्म इंडस्ट्री असो कि सामाजिक जीवन अथवा राजकीय आखाडा, ‘मुस्लिम’ नावाचा शब्द आला रे आला कि तो नकारात्मक ‘हीन’ भावना असलेला तो ‘विलेन’ ठरवला जातो.पठाण या आगामी चिटपाटणे एम नवीन वाद जन्माला घातला आहे,राजू महंत दास यांनी तर थिएटर पेटवून द्या असा अध्यादेशचा काढला आहे कारण तर दीपिका पदुकोण हिने केशरी रंगाच्या बिकीनीचा वापर केला आहेतर शारुख खान याने हिरवा शर्ट परिधान केला आहे ,यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याअगोदरहि ‘केशरी’ कपडे परिधान करून मुमताज,राजेश खन्ना,श्रीदेवी,रविना टंडन,अक्षय कुमार यांनी हि अवमानना केली पण यात काही हिंदू धर्मरक्षकांनी आक्षेप घेतला नाही,हिंदू समाजाच्या भावना ‘पठाण’ फिल्म असो की कोणतीही फिल्म असो ज्यात ‘मुसलमान’ त्यात त्याची भरभराटी दिसून आली की त्याला ‘विलेन’ कसा ठरवायचा हे सध्या भक्तांकडून जोरात चालू आहे ‘पठाण’ या चित्रपटाला ‘राजू महंत’ या धर्मगुरूंनी विरोध दर्शवला आहे आता एका चित्रपटात हिरो जरी शाहरुख खान असला तरी तो धार्मिक पद्धतीने विलेन आहे असा कयास लावला जात आहे,
केशरी रंगाची ‘बिकनी’ घालणारी ‘दीपिका पादुकोण’ हे मुस्लिम नाही अर्धवट तोटक कपडे घालून मास्टरजी चित्रपटात श्रीदेवीच्या अंगावर तोटके कपडे घालून ती नाचत असताना तेथे धर्म दुखावला जात नाही, हरे राम हरे कृष्णा हरे राम हे गाणे म्हणा अर्धनग्न कपड्यांमध्ये नाचणाऱ्या अर्ध नग्न मुलींमुळे धर्मसंकट निर्माण होत नाही तिथं भक्तीचा आव आणून काहीतरी आपण वेगळंच करतो असं वाटत नाही, ठीक आहे हि बाब हिंदू धर्माशी संलग्न असू शकते,त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु काही उलेमांनी देखील ‘पठाण’ या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे ऑल इंडिया उलेमा बोर्डचे अध्यक्ष ‘अनस अली’ यांनी या चित्रपटास विरोध दर्शवला आहे,त्यांनी सांगितलं आहे कि या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत,या मुले इस्लाम बदनाम होत आहे,
हा चित्रपट मध्यप्रदेश नव्हे तर संपूर्ण देशात चालू देणार नाही,ज्यावेळी चित्रपट क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर मुस्लिमांना सतत ‘विलन’ बनवणाऱ्या चित्रपटांबद्दल हे उलेमा कोठे असतात.या बाबतीत फतवा अथवा जाब का विचारला जात नाही, संपूर्ण देशात मुसलमान हा चित्रपट,सामाजिक क्षेत्र,किंवा राजकीय क्षेत्र असेल त्याला ‘विलेन’ घोषित केले गेले आहे. चित्रपटांच्या,नाटकांच्या माध्यमातून मुस्लिमांची प्रतिमा ‘मलिन’ आणि बदनामीची दाखवण्यात आली ज्यामध्ये आतंकवादी,गुंड,दहशतवादी,डॉन,बलात्कारी,बांगलादेशी पाकिस्तानचा हस्तक,स्लीपर सेल,लव्ह जिहादी, बनवून सतत बदनामी करण्यात आली.
‘पठाण’ या चित्रपटाला विरोध करणारे उलेमा कधी मुस्लिमांच्या बाबतीत ज्या ‘वल्गना’ जो ‘विरोध’ दाखवला जात होता त्यावेळेस ते पुढाकार का घेत नाहीत असा सवाल ही निर्माण होत आहे.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच असे चित्रपट बनवले गेले ज्यामध्ये आतंकवादी,असेल त्याच्यासोबत एके 47 दाखवण्यात आली. कोणीतरी दाऊद असेल आणि त्याचा हस्तक म्हणून देशातला ‘स्लीपर सेल’ मुसलमान दाखवण्यात आला ज्या काही छोट्या-मोठ्या बाबी आहेत या बाबी या थोतांड काही उलेमांना कसे दिसले नाही. एखाद्याने विरोध केला म्हणून आपणही विरोध करायचा ? हे कितपत योग्य आहे. ‘पठाण’या चित्रपटात अक्षय कुमार,अजय देवगण,सनी देओल असता तर मूक राहून हिरहिरीने चित्रपट रांगा लावून पहिला असता,आणि कोणी आक्षेप हि घेतला नसता.