पामा अबॅकस नॅशनल कॉम्पिटेशन स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर राजवीर बडेचे यश
बीड (प्रतिनिधी) मुंबई येथे दि.10 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील पामा अबॅकस नॅशनल कॉम्पिटेशन स्पर्धेमध्ये बीड येथील राजवीर बडे याने घवघवीत यश संपादन करुन पुरस्कार मिळवला आहे या बद्दल त्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की दि.10 डिसेंबर रोजी नेरुळ मुंबई येथे अबॅकस नॅशनल कॉम्पिटेशन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे स्वरुप 3 मिनीटात 100 प्रश्न सोडवणे असे होते यामध्ये बीड शहरातील कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूलचा राजवीर रविंद्र बडे याने सहभाग घेत यश संपादन करुन चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हा पुरस्कार मिळवत शाळेचे आणि बीड शहराचे नाव उंचावले आहे याबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.मेघराज पिंगळे, प्राचार्या श्रद्धा पिंगळे, साक्षी पवार मॅडम, आई -बाबा स्वाती रविंद्र बडे आदींनी कौतुक करत पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.