गावचा विकास करण्यासाठी नवगण परिवर्तन पॅनललाविजयी करा- डॉ.सारीकाताई क्षीरसागर..
नवगण राजुरी दि.१६(प्रतिनिधी):- पाच वर्षापुर्वी गावची जी परिस्थिती होती तीच आहे. गावाच्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने गाव विकासापासून वंचित राहिले. दाप-दडपशाही, भ्रष्टाचार आणि गुलामगिरीतून गावाला मुक्त करण्यासाठी नवगण परिवर्तन विकास पॅनलला विजयी करा असे प्रतिपादन डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केले.
ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्राचाराच्या तोफा काल थंडावल्या असून उद्या मतदान होत आहे. नवगण राजुरी ग्रामपंचायत प्राचाराची सांगता शुक्रवारी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या पदयात्रेने आणि कॉर्नर सभेने झाली. पदयात्रेला महिला, पुरूषांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पदयात्रा संपल्यानंतर कॉर्नर बैठकीत पुढे बोलताना डॉ.सारिकाताई क्षीरसागर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील लहान सहान गावालासुध्दा चांगले रस्ते आहेत मात्र राजुरीला येण्यासाठी चांगला रस्ता नाही ही गावची शोकांतिका आहे. हे गाव काकूंचे गाव म्हणून ओळखले जाते, या गावची काय अवस्था झाली. गावात स्वच्छता नाही, पिण्यासाठी शुध्द पाणी नाही, व्यवस्थित रस्ते नाल्या नाहीत. गेल्या पाच वर्षा पुर्वीची जी परिस्थिती आहे तीच आज आहे,
काहीही बदल झालेला नाही. परिस्थिती बदलण्यासाठी आपण जनतेला विश्वास द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. परिवर्तनाची सुरूवात राजुरीपासून करायची आहे. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. निर्भिडपणे मतदान करून नवगण परिवर्तन विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ.अंबिका लहू लगड यांच्यासह सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन गावाचे परिवर्तन करा असे त्यांनी यावेळी सांगितले.या शिवाय अच्युत लगड, सोनाली लगड, उमेदवार रामचंद्र बहीर, सारिका बहीर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी नवगण परिवर्तन विकास पॅनलचे सर्व उमेदवार, युवक, महिला-पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.