बीड मध्ये पुन्हा एक लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला…
बीड : येथील राज्य परिवहन महामंडळाचा वाहतूक नियंत्रक ३० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. सदरील सापळा बीड एसीबीने आज शुक्रवारी ( दि. १६ ) दुपारी यशस्वी केला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला कर्मचाऱ्याची चौकशी न करता पुन्हा सेवेत सामावून घेत बडतर्फीची कारवाई न करण्यासाठी वाहतूक नियंत्रक बीड किशोर अर्जुनराव जगदाळे ( वय ४० वर्ष ) रा. स्वराज्य नगर ,बीड याने तक्रारदार महिलेकडे १ लाख २० हजारांची मागणी केली. त्यातील ३० हजार रुपये स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडला आहे. या कारवाईमुळे बीडच्या रा. प. मंडळात खळबळ माजली आहे. लाचखोरीचे वाढते प्रमाण पाहून चिंता व्यक्त केली जात आहे.