माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या श्री गजानन बँकेच्या तीन शाखांना मंजुरी
औरंगाबाद येथे नवीन शाखा उघडण्यास रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी मंजुरी ..
बीड/प्रतिनिधी/सर्वांना आपलं मानणारी बँक या दृढ विश्वासाने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करणाऱ्या श्री गजानन नागरी सहकारी बँकेच्या तीन नवीन शाखांना रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नुकतीच मंजुरी दिली आहे बँकेने आता बीड जिल्ह्याबरोबरच मराठवाडा स्तरावर गरुड झेप घेतल्याने सभासद खातेदारांनी आनंद व्यक्त केला आहे
सलग आठ वेळा प्रथम सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळवणारी श्री गजानन नागरी सहकारी बँक दिवसेंदिवस गरुड झेप घेत असून आता या बँकेचे कार्यक्षेत्र बीड जिल्ह्यात मर्यादित न राहता जिल्ह्याच्या बाहेर मराठवाडा स्तरावर विस्तारित होत आहे या बँकेच्या एकूण सात शाखा ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळे यशस्वी वाटचाल करत आहेत आता ही बँक जिल्हा बाहेर लगतच्या जिल्ह्यात विस्तारित होत असून दोन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील पिंपळनेर व शिरूर कासार तसेच जिल्हालगत असलेल्या औरंगाबाद येथे नवीन शाखा उघडण्यास रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी मंजुरी दिली आहे बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे व सर्व संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असून मुख्य कार्यकारी अधिकारी एम आर क्षीरसागर तसेच बँकेचे सरव्यवस्थापक डॉ एम एस शेख आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभत आहे लवकरच या तीनही नवीन शाखा सुरू होणार असून बँकेला मिळालेल्या यशाबद्दल सभासद खातेदारांनी आनंद व्यक्त केला आहे