बिलोली चे शिक्षकांनी अल्पवयीन बालिकेच्या विनयभंगासाठी पोलीस कोठडी

0
113

बिलोली चे शिक्षकांनी अल्पवयीन बालिकेच्या विनयभंगासाठी पोलीस कोठडी…

 

नांदेड(प्रतिनिधी) खतीब अब्दुल सोहेल पोलीस ठाणे धर्माबादच्या हद्दीत दहावी वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला बिलोली जिल्हा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

 

पोलीस ठाणे धर्माबादच्या हद्दीत हा प्रकार 20 डिसेंबर रोजी घडला. धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक शिक्षक एका अल्पवयीन मुलीच्या घरी गेला. तिच्यासोबत लिहिण्यासाठी लाज वाटेल असे कृत केले. घडलेला प्रकार बालिकेने आपल्या नातलगांना सांगितला. तेंव्हा सर्वांनी पोलीस ठाणे धर्माबाद गाठले. धर्माबाद पोलीस ठाणयात प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शिक्षक सय्यद एजाज टेंभुर्णीकर विरुध्द पोलीसांनी गुन्हा क्रमांक 278/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 354(अ) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 9 नुसार दाखल केला आहे. घटनेतील गांभीर्य कळाल्याने पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरिक्षक संजय हिबारे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद कत्ते आदींनी अत्यंत प्रभावीपणे शिक्षकाला ताब्यात घेतले. काल दि. 21 डिसेंबर रोजी शिक्षक एजाज टेंभुर्णीकरला अटक झाली.

आरोपी कळून नांदेड जिल्हा चे वकील ए बी शरूख आरोपीची बाजी मांडली होती,पोलीसांनी आज शिक्षकाला बिलोली न्यायालयात हजर केला होता तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आणि शिक्षक एजाज टेंभुर्णीकरला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here