वरवटी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. शुभांगी चाटे यांचा विजय..
विजयी मिरवणूक न काढण्याचे जनतेला आव्हान
अंबाजोगाई, प्रतिनिधी:- शेख फेरोज / बीड जिल्यातील ग्रामपंचायत निवडणुक मतदान दिनांक १८ डिसेंबर रोजी झाले आहे. आज दिनांक २० रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली. अंबाजोगाई तालुक्यांतील मौजे वरवटी येथील कै. अनंतराव माणिकराव चाटे परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. शुभांगी सुधीर चाटे या 620 च्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. तसेच 9 पैकी 8 सदस्य देखील निवडून आले आहेत. परंतु वरवटी गावातील युवक रामकृष्ण गोविंद फड (वय वर्षे 25) यांचे अपघाती निधन झाले आहे त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. सदर दुःखद निधनामुळे सौ. शुभांगी सुधीर चाटे यांनी विजयी मिरवणूक न काढण्याचे जनतेला आवाहन केले आहे.