बीड (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे याहीवर्षी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 66 वी पुण्यतिथी निमित्त शहरातील केएसपी विद्यालयात दि.20 डिसेंबर 2022 रोजी अभिवादन करण्यात आले.यावेळी संस्थाध्यक्षा सौ.अंजलीताई शेळके मॅडम, शाळेचे प्र.मुख्याध्यापक श्री.जगदीश शिंदे, गटशिक्षणाधिकारी (पाटोदा) ऋषिकेश शेळके यांची उपस्थिती होती.
या वेळी मान्यवरांनी मनोगतामध्ये व्यक्त होतांना म्हटले की, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या विचारावर चालणे आज गरजेचे आहे कारण केवळ परिसरातच घाण होत नसून संपुर्ण देशामध्ये भ्रष्टाचाराच्या घाणीने प्रत्येक क्षेत्र व्यापले आहे त्यामुळे गाडगे महाराज यांचे स्वच्छतेचे विचार अवलंबून आणा परंतू त्यांनी किर्तनातुन प्रबोधन केलेले देशसेवा, धर्मसेवा, राष्ट्रसेवा या विचारांवर देखील सर्वांनी चालायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थिती होती.