वांगी, ताडसोन्ना, उमरी या ग्रामपंचायती जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या ताब्यात..
बीड दि.21(प्रतिनिधी)ः- नुकत्याच पार पडलेल्या बीड तालुक्यातील ग्रामपंचायतवर विजयाचा रथ सुरूच असून बीड तालुक्यातील वांगी, उमरी (उमरद), ताडसोन्ना या ग्रामपंचायतीवर माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे समर्थक प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत.
वांगी या गावचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव होते या ठिकाणी अशोक वाघमारे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत त्याचबरोबर ताडसोना ग्रामपंचायत वर सुद्धा आण्णा समर्थक विजयी झाले आहेत तसेच उमरी (उमरद) या ठिकाणी सरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब समर्थक विजयी झाले आहेत. या सर्व विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, अॅड.राजेंद्र राऊत, अच्युतराव शेळके, गोविंद खुरणे, भास्कर शेळके, देविदास शेळके, बाबासाहेब नागटिळक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.