बीड जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेनेची विजयी सुरुवात -: जिल्हाप्रमुख सचिन मुळूक

0
117

बीड जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेनेची विजयी सुरुवात -: जिल्हाप्रमुख सचिन मुळूक..

अनेक ग्रामपंचायतीत पदाधिकारी सत्तेत सहभागी

बीड, प्रतिनिधी। बीड/ ः नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्ष व मित्र पक्षांचा ग्रामपंचायतींवर झेंडा फडकला आहे. पक्ष स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यात बाळासाहेबांची शिवसेनेची विजयी सुरुवात झाली असून बीड जिल्ह्यात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी सत्तेत सहभागी झाले आहेत.

माजलगाव तालुक्यातील ब्रम्हगाव, गोविंदपूर, शुक्लतीर्थ लिंबगाव याठिकाणी सरपंच पदासहीत पॅनेलला घवघवीत यश मिळाले. केज तालुक्यातील दिपेवडगाव, सादोळा, कळंबआंबा येथे सरपंच पदासहित पॅनेलला यश मिळाले आहे. तर पिसेगाव (ता.केज) याठिकाणी उपसरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. परळी तालुक्यातील गोवर्धन, हसनाबाद या ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना व मित्र पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील साकूड येथे ग्रामपंचायत ताब्यात आली आहे. वडवणी तालुक्यातील साळींबा येथे बाळासाहेबांची शिवसेना व मित्र पक्षाचा झेंडा फडकला आहे. या सर्वांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी अभिनंदन केले.
चौकट
अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. अशांनी राजकीय पक्षात प्रवेश करू ईच्छित असल्यास बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सहभागी व्हावे. त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल.
-सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here