नेकनूर-मांजरसुंबा.रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू..
नेकनूर- मांजरसुंबा रोडवरील आठवड्यातील दुसरी घटना..
नेकनूर दि. 23 (प्रतिनिधी) नेकनूर मांजरसुंबा – रोडवरील रत्नागिरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी रात्री ७ वा. सुमारास घडली. गाडीचे चाक डोक्यावरूच गेल्याने ओळख पटणे अवघड झाले होते. मात्र पायातील बूटामुळे ओळख पटवण्यात आली. मयताचे नाव शरद भारत मेंगडे ( वय २५ वर्ष) रा. सफेपूर ता.बीड असल्याचे सांगण्यात आले. रक्तात भरून गाडीचे चाक रस्त्यावर | उमटल्याने चार चाकी कार असल्याचे प्राथमिक | अंदाज व्यक्त केले जात आहे.
घटनास्थळापासून जवळच होंडाई कारचा साईड ग्लास तुटलेला भाग मिळाल्याने ते वाहन कारच असल्याचे अंदाज नेकनूर | पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती | मिळताच नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन | मृतदेह शवविच्छेदन साठी नेकनूर कुठीर रुग्णालयात पाठवला. दरम्यान या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढते असून आठवड्यातील हा दुसरा अपघात आहे.