पत्रकार बालाजी मारगुडे यांना जिंतूर प्रेस क्लबचा पुरस्कार जाहीर..

0
109

पत्रकार बालाजी मारगुडे यांना जिंतूर प्रेस क्लबचा पुरस्कार जाहीर..

प्रतिनिधी । बीड (सोबत पासपोर्ट जोडला आहे)
दि.23 : जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर सामाजिक वार्ता दर्पण पुरस्कार’ बीड येथील दैनिक कार्यारंभचे कार्यकारी संपादक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाहक बालाजी मारगुडे यांना जाहीर झाला आहे.

पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, जांभेकरी पगडी आणि शाल असे हे पुरस्काराचे स्वरूप आहे. दर्पण दिनी 6 जानेवारी रोजी हा पुरस्कार वितरीत केला जाणार आहे. तालुका प्रेस क्लबच्या वतीने ‘मराठवाडा विभागातील पत्रकारिता क्षेत्रामध्ये योगदान देणार्‍या व निर्भीडपणे लिखाण करणार्‍या दोन पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सामाजिक वार्ता दर्पण पुरस्कार व आचार्य बाळशास्त्री जांभेकर विकास वार्ता दर्पण पुरस्कार देण्यात येतो.

पुरस्कार समारंभावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते व साहित्यिक प्रा. नामदेवराव जाधव  यांचे तर ‘मी कसा घडलो’ या विषयावर मुंबई येथील प्रसिध्द उद्योजक अ‍ॅड. पंडित राठोड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सकाळ युथचे संपादक संदीप काळे मुंबई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पुरस्कारप्राप्त पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचवेळी जिंतूर प्रेस कल्बचा दुसरा ‘विकास वार्ता पुरस्कार’ जालना येथील पत्रकार फकिरा देशमुख यांना जाहीर झालेला आहे. हा कार्यक्रम 6 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता जुनी मुन्सबी, भाजी मंडई जिंतूर या ठिकाणी एका भव्य कार्यक्रमात होत आहे. यापूर्वी हे पुरस्कार अभिमन्यू कांबळे, संतोष धारासूरकर, राजाभाऊ नगरकर, सुरज कदम, सुरेश जपंनगीरे, विठ्ठल भिसे यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन, जिंतूर तालुका प्रेस क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here