कला साधकांच्या रंगधारेमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

0
114

कला साधकांच्या रंगधारेमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

 

संस्कार भारतीच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शेकडो कलाकारांची उपस्थिती


बीड- संस्कार भारती बीड च्या वतीने आयोजित  कलासाधक संगम च्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता बीड शहरातून महाराष्ट्राची रंगधारा अर्थात शोभायात्रा काढण्यात आली .पोतराज ,जागरण गोंधळ, विठू माऊली आणि नऊवारी नेसलेल्या सुवासिनी अशा वेगवेगळ्या वेशभूषेत देवगिरी प्रांतातील शेकडो कला साधकांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

बीड येथे 23 ते 25 डिसेंबर दरम्यान देवगिरी प्रांताचा कलासाधक संगम आयोजित करण्यात आला आहे या कला साधक संघमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते  योगेश सोमन यांच्या हस्ते झाले शनिवारी सकाळी साडेआठ वाजता अण्णाभाऊ साठे चौक येथून महाराष्ट्राची रंगधारा अर्थात शोभा यात्रेला प्रारंभ झाला या शोभायात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाच्या लेझीम पथकातील विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले लक्ष्मीकांत सौंदतीकर यांनी पोतराजाची वेशभूषा केली तर बीड समितीने वारकऱ्यांच्या वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले धाराशिव जळगाव चाळीसगाव नांदेड जालना तुळजापूर माजलगाव अंबाजोगाई येथील वेगवेगळ्या वेशभूषा करत या शोभा यात्रेची शोभा वाढवण्याचे काम केले

सकाळी सकाळी शहरातील सुभाषरोड,माळीवेस,बलभीम चौक,राजुरी वेस मार्गाने निघालेल्या या रंगधारेमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन बीड वासीयांना झाले.बीड शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही शोभायात्रा मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून कलासाधकांच्या चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here