श्री.श्री रविशंकर विद्या मंदिर च्या चिमुकल्यांची शैक्षणिक सहल संपन्न..
बीड (प्रतिनिधी) -शहरातील श्री.श्री.रविशंकर विद्यामंदिरची सहल शहराजवळील गोरक्षनाथ टेकडी व रोपवाटिका येथे नेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक हंसे सर, उपमुख्याध्यापिका सौ.अनिता सुर्यवंशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयोजीत करण्यात आली होती.
सहली दरम्यान चिमुकल्यांनी निसर्गाच्या सानीध्यामध्ये ध्यान करून खेळण्याचा मनसोक्त हिंडण्याचा आनंद घेतला व रोपवाटिकेमध्ये विविध नवनवीन फुलांची ,झाडांची रोपांची माहिती घेतली त्याचप्रमाणे विविध मातीच्या वस्तू पाहिल्या व मातीच्या वस्तू कशा बनतात याविषयीची माहिती चिमुकल्यांनी घेतली. गोरक्षनाथ टेकडी येथे विविध प्रकारच्या खेळण्याचा आनंद मुलांनी घेतला त्याच बरोबर निर्सगाच्या सानिध्यात जेवणाच्या सुद्धा आस्वाद घेतला .
त्याच प्रमाणे इ.पहीलीची व दुसरीची सहल शांतिवान पाली येथे नेण्यात आली,या सहली मधे मुलांनी निसर्ग सानिध्यात खेळण्याचा, खाण्याचा आनंद लुटला. पालीच्या तळ्याला भेट दिली, यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याचा योग्य वापर कसा करावा हे श्री.देशमुख सर यांनी समजावून सांगितले.सहल यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री हंसे सर उपमुख्यध्यपिका सौ.अनिता सूर्यवंशी मॅडम त्याचप्रमाणे सौ कल्पना मॅडम सौ अपर्णा मॅडम व सौ स्वाती मॅडम,अमृता मॅडम, सुषमा मॅडम, गौरी मॅडम ,श्री. कटेगर काका, श्री जाधव भैया व शुभांगी ताई, राधा ताई यांनी परिश्रम घेतले.