राष्ट्र सेवा दल मालेगाव तर्फे विठ्ठल मंदिरात साने गुरुजींना अभिवादन आणि अश्वरोहक साईराज पवार याचा सत्कार.
मालेगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र माऊली परमपूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त येथील राष्ट्र सेवा दला तर्फे अभिवादन करण्यात आले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले व्हावे या उद्देशाने केलेल्या साने गुरुजींच्या पंढरपूर येथील उपोषणाच्या अमृत महोत्सवी वर्षपुर्ती निमित्त कॅम्प भागातील टीव्ही सेंटर जवळील विठ्ठल मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्यामकांत पाटील यांचे हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस खादीचा हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी राष्ट्र सेवा दल मालेगावचे माजी कार्याध्यक्ष संतोष पवार यांचा मुलगा अश्वरोहक साईराज पवार यांचा सारंगखेडा येथील अश्वक्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्या बद्दल सत्कार करण्यात आला व अभिनंदन करण्यात आले. श्यामकांत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना साने गुरुजीचा विचार घेऊन जीवन जगण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर यांनी केले. आभार मोरेश्वर जोशी यांनी मानले. यावेळी माजी जिल्हा संघटक रविराज सोनार, संतोष पवार, अतुल मोरे, सिद्धार्थ मगरे, विशाल पवार, साईराज पवार, अजिंक्य शिनकर, गौरव साळवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.