संस्कार भारतीच्या व्यासपीठावर स्थानिक कलावंतांची संगीत मैफल रंगली
बीड/प्रतिनिधी व्यासपीठ कुठलेही असो बीडच्या कलावंतांना तोड नाही बीड शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमात स्थानिक कलावंतांच्या मैफिलीसाठी शेकडो रसिकांची दाद मिळते काल रात्री दहा वाजता संस्कार भारती आयोजित कलासाधक संगम या व्यासपीठावर स्थानिक कलावंतांची संगीतमयफल चांगलीच रंगली
गेल्या दोन दिवसापासून बेड शहरात 14 जिल्ह्यातील कलाकारांची मांदियाळी जमलेली आहे संस्कार भारती ने कला साधक संगम सोहळा आयोजित केला आहे तीन दिवशीय कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शास्त्रीय संगीत सभा, रंगधारा, नाट्यविधा सादरीकरण, साहित्य विधा, सादरीकरण नृत्यविधा सादरीकरण, आणि स्थानिक कलावंतांचा कलाविष्कार अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बीडच्या भरत अण्णा लोळगे, प्रा सतीश सुलाखे,नामदेव साळुंके,वासवदत्ता हासेगावकर, सुधीर देशमुख, ऋतूपर्ण रामदासी,कौशिक धुतेकर,सचिन मार्गे,वासुदेव काजळे,सानप सर,या स्थानिक कलावंतांनी आपले गायन वादन सादर केले त्यांना तबला साथ प्रकाश मानूरकर तर हार्मोनियम सुदर्शन धुतेकर यांनी दिली,बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कलाकारांनी स्थानिक कलावंतांच्या गायनाला दाद देऊन मैफल रंगवली,निवेदन दत्तप्रसाद गोस्वामी यांनी केले यावेळी संस्कार भारतीचे सर्व पदाधिकारी तसेच शहरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते