बौद्ध विहार हे संस्कार केंद्र व्हावेत – डॉ.योगेश क्षीरसागर
माळीवेस भागातील बौद्ध विहाराला भेट देत बांधकामाची केली पाहणी..
बीड दि.25 (प्रतिनिधी) शहरातील माळीवेस भागातील बौद्ध विहराचे काम अंतीम टप्प्यात आले असून सुरू असलेल्या बांधकामाची डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पाहणी करत काम दर्जेदार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की,बौध्द विहार हे बौद्ध धर्मीयांचे प्रार्थनास्थळ म्हणजेच बौद्ध मंदिर आहे. विहारात बौद्ध भिक्खु-भिक्खुणी निवास करतात. बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. बौद्ध विहार हे बौद्ध धम्मीय शिक्षणाचे केंद्र असते. स्त्रियांना स्वातंत्र्याचा हक्क देणारा बौद्ध धर्म हा जगातला पहिला धर्म आहे. समानता हा धम्माचा पाया असून प्रत्येकाचा सन्मान हे धम्माचे मूल्य आहे. समाज बांधवांनी या विहारात येऊन तथागत गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करावेत.बौद्ध विहार हे संस्कार केंद्र व्हावेत. मा.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने बीड शहरात मोठ्या प्रमाणात बौद्ध विहार उभारले आहेत.
जितकी संख्या बीड शहरात आहे तितकी इतर कुठल्याही शहरात नाही. शहरातील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी बौद्ध विहार असणे महत्वाचे आहे. त्यामुळे मा. नगराध्यक्षांच्या प्रयत्नांतून समाज बांधवांना धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने बौद्ध विहार उभारण्यात आले. माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या पुढाकारातून बौद्ध विहार आणि येथे राहणार्या भिक्षू निवासासाठी निधी उपलब्ध करून विहाराच्या परिसरात सुसज्य भिक्षू निवास, सांस्कृतिक सभागृह उभारले. माळीवेस भागातील या बौद्ध विहारात बौद्ध भिख्खूसाठी निवासासाठी खोल्या, आंघोळीची व्यवस्था, शौचालय, पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून बांधकामासाठी लागणारे साहित्य देखील उत्तम दर्जाचे वापरण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक असे बौद्ध विहार तयार होत आहे.आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम अत्यंत दर्जेदार झाले असून या बौद्ध विहाराच्या कामाबद्दल समाधानी असल्याचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विहाराच्या परिसरात जाऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. स्थानिक नागरिक आणि महिलांनी समाज बांधवांसाठी बौद्ध विहार उभारल्याबद्दल डॉ.योगेश क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. याप्रसंगी भीमराव वाघचौरे,गणेश वाघमारे,विकास जोगदंड, सनी वाघमारे,चंदू वडमारे, जयदीप सवई, नितीन साखरे,गोरख यादव, किरण बेद्रे, भिंगरेश जोगदंड,बंडू निसर्गंध यांच्यासह नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.