माझा विजय गावचे बहाद्दर मतदार आणि जयदत्त आण्णांच्या नेतृत्वामुळेच – बालासाहेब जाधव..
बीड दि.25(प्रतिनिधी)ः- बीड मतदार संघातील लिंबागणेश येथे सरपंच पदासाठी मी बाळासाहेब जाधव निवडणुकीच्या रिंगणात होतो दरम्यानच्या काळात माझ्या विजयासाठी गावातील सर्वच माझ्या हितचिंतकांनी मनापासून प्रयत्न केले. मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करत आहे ही निवडणूक लढत असताना मी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालीच लढलेली आहे, जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या गटाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत
मी यापूर्वीही अण्णांच्या नेतृत्वाखाली काम केले असून यापुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे, निवडणूक झाली आहे आता लिंबागणेश गावच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून माननीय अण्णांच्या माध्यमातून मी ग्रामस्थांचे प्रश्न सोडून घेण्यासाठी प्रयत्नशील राहील. माझ्या विजयानंतर सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमधून काही जणांनी खोट्या बातम्या पसरवून ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवले आहेत ते केवळ श्रेय लाटण्यासाठीच असल्याचे नवनिर्वाचित सरपंच बालासाहेब जाधव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.