नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्रीराम बहीर तर उपाध्यक्षपदी जितेंद्र पोतरकर यांची बिन विरोध निवड..

0
107

नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्रीराम बहीर तर उपाध्यक्षपदी जितेंद्र पोतरकर यांची बिनविरोध निवड..

बीड दि.26(प्रतिनिधी)ः- नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. बीड च्या अध्यक्षपदी श्रीराम बहीर तर उपाध्यक्षपदी जितेंद्र पोथरकर तसेच सचिवपदी शामराव वनवे व खजिनदारपदी सुमित्रा अडसूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीराम बहीर हे संचालक मंडळाच्या निवडणूकीत सर्वाधिक मताने निवडून आले असून त्यांची चेअरमनपदी सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली.

बीड जिल्ह्यात सर्वात मोठी आणि सर्वाधिक सभासद संख्या असलेली शिक्षक पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवजिवन शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक गेल्या 27 नोव्हेंबर रोजी पार पडली. यात तीन पॅनल निवडणूकीच्या रिंगणात होते त्यापैकी एक पॅनल भुईसपाट झाला तर आमदार पुरस्कृत पॅनलचा सर्व प्रतिष्ठा पणाला लावूनही धुव्वा उडाला. त्यांना केवळ दोन जागेवर निसटता विजय मिळवता आला. नवजीवन शिक्षक पतसंस्थेत सभासदांच्या लाभाचे निर्णय घेतल्याने आणि पारदर्शक कारभार केल्यामुळे विद्यमान चेअरमन श्रीराम बहीर यांच्या शिक्षक विश्‍वास पॅनलला मतदारांनी भरघोस मते देऊन विश्‍वास दाखवल्यामुळे शिक्षक विश्‍वास पॅनलचे 15 पैकी 13 उमेदवार मोठ्या फरकाच्या मताधिक्याने विजयी झाले.

श्रीराम बहीर यांना या निवडणूकीत सर्वाधिक म्हणजे 713 मते मिळाली. नवजीवन पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचीत संचालकांची सोमवार दि.26 रोजी नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या  कार्यालयात बैठक बोलवण्यात आली. यात अध्यक्षपदी श्रीराम बहीर तर उपाध्यक्षपदी जितेंद्र पोथरकर, सचिवपदी शामराव वनवे आणि खजिनदारपदी श्रीमती सुमित्रा अडसूळ यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एम.बारगजे यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी ठोसर आर.एस. यांनी सहकार्य केले. यावेळी संचालक सर्व श्री सुमंत खांडे, आनंद पिंगळे, अंकुश निर्मळ, वायकर गोविंद, दत्तात्रय कवचट, सुरेश ढास, विजय खोसे, श्रीमती मनिषा मुंडे, शिवनाथ म्हेत्रे, भगवान पवार, विजयकुमार समुद्रे यांच्यासह सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here