शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात दीपाने काकूंचा वारसा जोपासला – जयदत्त क्षीरसागर..

0
119

काकूंच्या पाऊलावर मार्गक्रमण करत शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात दीपाने काकूंचा वारसा जोपासला – जयदत्त क्षीरसागर…


माझे आयुष्य नाट्यमय घटनांचा अविश्रांत प्रवास होता – डॉ. दीपा क्षीरसागर

बीड दि.28(प्रतिनिधी):- माझ्या परिवारातील संघर्षमय जबाबदार व्यक्तिमत्वच्या गुण गौरवाचा कार्यक्रम आहे, दीपा चा आय क्यू प्रचंड मोठा आहे, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सर्वच क्षेत्रात आलेल्या संधीचे सोने दीपा यांनी केले. काकूंच्या पाऊलावर मार्गक्रमण करत शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात दीपाने काकूंचा वारसा जोपासला. नावात चैतन्य, ऊर्जा समावलेल्या दीपा, ती रिटायर होतीये पण थकली नाही तर नव्याने अजून कार्य करण्याची उर्मी तिच्यात आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा सुप्रसिध्द् लेखिका डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या सेवागौरव व साहित्य महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, न.शि.सं.राजुरी नवगणचे सचिव तथा मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उत्सवमुर्ती प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर, सुप्रसिद्ध सिनेनाट्य, पटकथा लेखक अरविंद जगताप, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. भारत सासणे, युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात काकू-नाना, सुहासिनी इर्लेकर व यशवंतराव इर्लेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सन्मानपत्राचे लेखन आणि वाचन कुलदीप धुमाळे यांनी केले. दीपा ताईंच्या जीवनावर आधारित चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांच्या हस्ते औक्षण करण्यात आले.
यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, परी कथेतल्या परिसारखी दीपा आली. माझ्या जीवनातील यशामध्ये दीपा चा सिहाचा वाटा आहे, दीपा माझी पत्नी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. राजकीय क्षेत्रात काम करत असताना प्रामाणिकपणे काम केले. राजकीय, शैक्षणिक सर्वच क्षेत्रात दीपाचे कार्य खूपच परिपूर्ण आहे, त्याच दीपा उत्तम पत्नी आणि आई आहे.
यावेळी डॉ.दिपाताई क्षीरसागर म्हणाल्या की, माझे आईवडील प्रथम आदर्श होते, त्याच्या संस्कारातून मी घडले, संघर्षातून शिक्षण घ्यावे हे आईनी शिकवले. पुढे काकू आणि नानांनी संस्कार आणि शिक्षण कसे आयुष्यात वापरावे हे त्यानी शिकवलं. प्रशासकीय  कामात माझ्यासमोर वडिलांचा आदर्श होता. सभापती असताना कधीही तासिका बुडविली नाही. घर, कॉलेज, सभापती पद सगळं सोबतच सांभाळलं. तरुणवयात कर्तृत्व दाखवता येतं या काकूंच्या शब्दावर मी प्राचार्य पद स्वीकारले, त्यावेळी काकूंच्या दूरदृष्टी पणाचे आज प्रचंड कौतुक वाटतं. कुटुंब समजून मी कॉलेज सांभाळलं. विविध अंगी शिक्षणासाठी अनेक कोर्सेस सुरु केले.  इतर कॉलेजमधल्या उपप्रचार्याची मुली केएसकेत शिकल्या याचा समाधान वाटतं. कॉलेजला जेव्हा ए ग्रेड मिळाला तेव्हाच कुलगुरू म्हणाले की, आपलं कॉलेज स्वयत्त करून घ्या, कारणं आपलं कॉलेज मिनी विद्यापीठ आहे. हे शब्द अभिमानाचे आहेत. पती म्हणून केवळ साथ दिली नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहित करण्याचे काम आजपर्यंत अध्यक्ष साहेबांनी केले.

स्त्रिपुरुष समतेचे पुरसकर्ते अध्यक्ष साहेब पती म्हणून लाभले हे माझे सौभाग्य. भारतभूषण यांचे नाव माझ्या सोबत आहे तो माझा सर्वोच्च पुरस्कार आहे, उत्तम समजूतदार मुलं लाभली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी हल्ली पुस्तक वाचत नाही कारणं मी माणसं वाचते, आपल्या सर्वांचे प्रेम आदरभाव पाहून मन भरून येते, आपल्या सर्वांचे आशीर्वाद हीच माझी आयुष्यभराची कष्ठाची खरी कमाई. तुमच्या प्रेमाच्या ओझ्याने मी भारवले आहे. कॉलेजच्या कॅम्पस मधील माझा वावर मला खुप आवडतो. यापुढेही सर्वच क्षेत्रात काम करायचे आहे, जे कार्य अजूनही अपूर्ण राहिली आहे, ते पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सुप्रसिद्ध सिनेनाट्य पटकथा लेखक मा.अरविंद जगताप म्हणाले की, सगळ्या क्षेत्रात कार्यरत असूनही ऊस तोड कामगारांवर लिखाण करणार्‍या ताई प्रचंड संवेदनशील आहेत, पुरोगामी विचाराचा वारसा लाभलेल्या क्षीरसागर कुटुंबियांकडून आदर्श घेऊन बीडकरांना काकू आणि दीपाताईंच्या पाऊल्यावर पाऊल टाकून मार्गक्रमण करायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी उपप्राचार्य शिवाजी शिंदे, प्राचार्य आबासाहेब हांगे, यासर्वानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांनी केले. आभार प्रदर्शन उप प्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर तर सूत्रसंचालन डॉ.शोभा पुजारी यांनी केले.
कार्यक्रमास शहरातील सर्व स्तरातील प्रतिष्ठित व्यक्ती, क्षीरसागर कुटुंबातील सर्व सदस्य, महाविद्यालयातील तसेच संस्थेतील सदस्य, शहरातील माजी नगरसेवक, प्रभारी प्राचार्य शिवानंद क्षीरसागर, उप प्राचार्य सय्यद लाल, प्राचार्य डॉ. राजपांगे, उप प्राचार्य विलास भिल्लारे, प्रा.सतीश माउलगे, मिलिंद शिवणीकर, प्रा.जालिंदर कोळेकर यांच्या सह शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, महिला-पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here