नाशिक येथे वंजारी समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन

0
111

साहित्य वंचितांचा आवाज आसावा -खानदेश रत्न संमेलन अध्यक्ष प्रा. वा. ना.आंधळे…

नाशिक येथे वंजारी समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन..

नाशिक (ंप्रतिनिधी)-साहित्य हे वैश्विक जाणिवेचे असावे .समाज आणि साहित्य वेगळे नसते या भावनेतून साहित्याची मांडणी झाल्यास ते एकजन्सी होईल आणि त्याचं साहित्यातून खर्‍या अर्थाने वंचितांचा आवाज बुलंद होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहत्यिक लेखक खानदेश रत्न प्रा.वा.ना.आंधळे यांनी केले.
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित वंजारी समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी ( दी.25) रावसाहेब थोरात सभगृह गंगापूर रोड नाशिक येथे पार पडले संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला पुष्पहार अर्पण करून ग्रंथ दिंडी शुभारंभ झाला दरम्यान व्हि एन नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून पुढे व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील लोकनेते स्वर्गिय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रंथ दिंडी कार्यक्रम स्थळी पोहचली दिंडीत अनेक नव तरूण साहित्यिक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यासपिठावर उद्घाटक विदर्भ रत्न बाबाराव मुसळे सिद्धिविनायक मानव कल्याण विकास मिशन नाशिक चे अध्यक्ष डॉ तुळशीदास महाराज गुट्टे, वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक गणेश खाडे, राज्य सरचिटणीस डॉ लक्षराज सानप ,डॉ विजय दहिफळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, समाजसेविका तथा राष्ट्रीय घुमातुंक परिषद उपाध्यक्ष सौ कांचनताई खाडे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे,, सु प्रसिद्ध उद्योजक बुधाजीराव  पानसरे , दामोदर मानकर , माधुरी पालवे , राष्ट्रीय वंजारी वंजारा संघाचे प्रदेशाध्यक्ष समाज भूषण के.के. सुत्र संचालक डॉ रघुनाथ बोडके, शिवाजीराव वंजारी,सारंग दराडे , रमेश आव्हाड, अभिजीत दिघोळे,आरती मोराळे, अँड तानाजी जायभावे, अनिलजी सानप  संदीप ढाकणे जी स्वागत अध्यक्ष प्रशांत आंधळे , मारुती उगले , बाळासाहेब घुगे , लता गुठे , ज्ञानोबा केंद्रे ,मोहन सिरसाठ राजेंद्र मुंढे डॉ संगिता घुगे दैनिक सोमेश्वर साथी परळी चे बालासाहेब फड, वंजारी पुकारचे दत्ता जायभाये, दैनिक चालू वार्ता औरंगाबाद चे उपसंपादक मोहन आखाडे, पत्रकार मोहन सिरसाठ, रामभाऊ आवारे , अर्जुन डोमाडे, प्रा डॉ शिवाजीराव हुसे, सुरेश कालेरू तेलंगणा दि .बा मुंडे हे मान्यवर उपस्थित होते.
आंधळे म्हणाले साहित्यातून सामाजिक विषमता प्रश्न मांडता आले पाहिजे. साहित्य समाज आणि नात्यांपलीकडे असते सामूहिक पद्धतीने लढा  दिल्यास त्याला यश मिळते त्यामुळे भविष्यात अधिक भव्य संमेलन भरून समाजाला योग्य दिशा देण्यात आव्हान त्यांनी केलं.

हुंडा पद्धत वाढते घटास्पोट बेरोजगारी हे समाजातील मुख्य प्रश्र्न असून ते सोडविण्यासाठी संघटीत होण्याची होण्याची गरज असल्याने आव्हान डॉ. लक्षराज सानपयांनी केले समाजाची  एकजुट कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे  सौ कांचनताई खाडे आणि मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला.  
साहित्य समाज घडविण्यासाठी ताकद आहे त्यामुळे समाजभिमुख उत्तमोत्तम साहित्य निर्माण व्हायला हवे हे अशी अपेक्षा गणेश खाडे यांनी व्यक्त केली. संमेलनास गुजरात तेलंगणासह राज्यभरात समाजबांधव सहभागी झाले सुत्र संचालन अनिल सानप व संदीप ढाकणे यांनी उत्कृष्ट पणे पार पाडले स्वागत गीत अश्विनी कांयदे यांनी उत्कृष्ट पणे गायले  पहिल्या सत्रा नंतर सौ लता गुठे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद सत्र संपन्न झाल या मध्ये प्रा विठ्ठल जायभये,सौ सुलभा मुंडे, विवेक उगलमुगले , मनिषा बडे ,सौ संगिता घुगे यांनी मार्गदर्शन केले तद नंतर प्रा भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली कथा कथन सत्र संपन्न झाल ज्यामध्ये अंबादास केदार, रंजना सानप यांनी व भास्कर बडे यांनी अ प्रतिम कथा कथन सादर केले भास्कर बडे यांची मुंडे साहेब यांच्या वरील कविता खूप आकर्षक ठरली  तद नंतर सिंधुताई दहिफळे यांनी दिप प्रज्वलन करून कवी संमेलन उद्घाटन केले व बालाजी किनगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन पार पडल ज्या मध्ये नामांकित कवी संजय खाडे, औरंगाबाद छाया जायभाये,जालना, अशोक गुठे सालेगावकर, सौ अलकनंदा आंधळे घुगे, कल्याणी घुगे, संगिता घुगे, प्रिती बेटकर,दता खुळे, अशोक खेडकर, कु सानिका खेडकर,सतिष दराडे, रविंद्र कांगणे,मनोहर आंधळे, शिवाजीराव सानप,सौ उषाताई फड, चंदकांत धस ,गोरख पालवे , गजानन दराडे,नारायण खेडकर, राजकुमार मोरगे, रघुनाथ घुगे,संजय तिडके,जना नागरगोजे,वंदना केंद्रे,मारोती मुंडे, मनिषा बडे,सुरेखा डोंगरे , इत्यादी कवींनी सहभाग नोदवुन उपस्थितांना मंत्रमुग्ध करून अ प्रतिम काव्य रचना सादर केली. नंतर समारोप आभार प्रदर्शन अनिल सानप यांनी केले.व यशस्वी पणे सर्व सत्र व्यवस्थित पणे पुर्ण करत ऐतिहासिक संमेलन पार पडले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here