मुस्लिम इनामदार शेतकऱ्यांचे तातडीने प्रश्न मार्गी लावणार.. अब्दुल सत्तार…
नागपूर प्रतिनिधी नागपूर मध्ये चालू असलेल्या हिवाळी अधिवेशना मध्ये मुस्लिम समाजातील विविध प्रश्नावर व इनामदार समाजातील इनामी जमिनी बाबत शासनाचे ध्येय धोरण व नवीन अध्यादेशावर कृषिमंत्री यांच्यासोबत इनामदार, मुतवल्ली, सज्जादा अँड ट्रस्टीज फेडरेशन वक्फ या संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष गौस शिरोळकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये कृषी मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी भेट घेऊन इनामदार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे .पीक कर्ज मिळाले पाहिजे. राज्यभरातील इतर शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय लाभ मुस्लिम इनामदार शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत तसेच वक्फ बोर्डाच्या संबंधित केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ इनामदार शेतकऱ्यांना मिळावा या व इतर इनामदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली..
त्या वेळी मंत्री महोदयांनी राज्यातील मुस्लिम इनामदार शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे महासचिव मौलाना जमील सय्यद. हाजी फिरोज लाला तांबोळी हाज कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य इरशाद इनामदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.