डॉ.योगेश क्षीरसागरांच्या हस्ते बुरुड गल्लीत सिमेंट काँक्रिट रस्ता आणि नाली कामाचे उद्घाटन संपन्न..
बीड दि.29 (प्रतिनिधी) :- शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. शहरातील बुरुड गल्लीत डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्या हस्ते सिमेंट काँक्रिट रस्ते आणि नाली कामांचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, बीड शहराचा विकास होताना सामान्य नागरिकांना पहायला मिळत आहे.प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे केले जात आहे.शहरात पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात, असा आमचा मानस आहे. त्यादिशेने आपण काम करत आहोत.शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच स्वच्छता, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर देत आहोत.रस्ते आणि नाली चे काम वेळेवर पूर्ण करण्याच्या संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या.तसेच आपल्या परिसरात सुरू असलेल्या कामांकडे नागरिकांनी देखील लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी नागरिकांना केले.यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अमृत सारडा, मा.नगरसेवक राणा चौव्हान, सतिश पवार, महेंद्र सारडा, भरत चुंगडे, रामेश्वर कानडे, रमेश बेदरकर, दगडु म्हेत्रे, अर्जुन वडतीले, उत्रेश्वर कानडे, राजाभाऊ आतकरे, उद्धव क्षीरसागर, अमोल पौळ, विकास यादव, पवन राजपूत, किशन चौव्हाण, रंजित चव्हाण, समर्थ पटकुटवार, सचिन वडतीले, अमोल चिपाडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.