नेर्ले ग्रामपंचायत नूतन सरपंच संजय पाटील व सदस्यांचा आम. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार..
इसलामपूर दि(प्रतिनिधी)इकबाल पीरजादे
नेर्ले (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भरघोस यश मिळविले. येथे लोकनियुक्त सरपंचपदी वाळवा तालुका संजय निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील विजयी झाले. त्यांच्यासह नुतन ग्रामपंचायत सदस्यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. सरपंच श्री. पाटील यांच्यासह नूतन सदस्य महेश पाटील, किरण पाटील, शरद बल्लाळ, शैलजा पाटील, मनिषा गडाळे, मंगल पोळ, राणी जामदार, अनिल साळुंखे, भारती रोकडे, दिपक माने, मनिषा माने, जयश्री कुंभार, जयसिंग पाटील यांना पुष्पगुच्छ देवून आमदार नाईक यांनी सत्कार केला.
गावच्या आदर्श व पारदर्शक कारभारासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र केसरी अप्पासो कदम, दिलीपराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, हेमंत पाटील, महेश पाटील, धनाजी पाटील जालिंदर पाटील, माजी सरपंच छायाताई रोकडे, राजाराम पाटील, अंकूश पाटील, मोहन पाटील, शंकर बल्लाळ, राहूल पाटील, कृष्णा माने, अमित पाटील आदी उपस्थित होते.