माजलगाव ( प्रतिनिधी ) येथील माजलगाव एकता पत्रकार संघाच्या वतीने मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देण्यात येणार असुन मुकनायक पुरस्कारासाठी बिड येथील निर्भीड पत्रकार व दै पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे व सा.बीडनेताचे संपादक पत्रकार प्रचंड सोळंके यांना जाहिर झाला असुन माजलगाव भुषण पुरस्कार माजलगाव शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळु ताकट,संजिवनी हाँस्पीटलचे डॉ.ज्ञानेश्वर गिलबीले,हिंदवी स्वराज्य आर्बनचे मुख्य कार्यकारी सुरेश मोरे,आर.के मोबाईल शाँपीचे रियाज काझी यांना जाहिर करण्यात आले असुन या पुरस्काराचे वितरण मुकनायक दिनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती जेष्ट मार्गदर्शक पत्रकार तथा संपादक प्रदीप कुलकर्णी व माजलगाव एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्योतिराम पाढंरपोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
माजलगाव एकता पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारासह माजलगाव तालुक्यातील सामाजिक कार्यात,आरोग्य रुग्ण सेवेमध्ये,उद्योजक, सहकारासह इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या बिड जिल्ह्याच्या व माजलगाव तालुक्याच्या मातीतील व्यक्तीस मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देऊन यावर्षापासून सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे यावर्षीचे पत्रकारीतेतील योगदानाबद्दल बिड येथील निर्भिड पत्रकार तथा दै पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे व सा.बीडनेताचे संपादक पत्रकार प्रचंड सोळंके यांना जाहीर करण्यात आला असुन, माजलगाव भुषण पुरस्कारा मध्ये शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळु ताकट ( सामाजिक कार्य ) संजिवनी हाँस्पीटलचे संचालक डाँ.ज्ञानेश्वर गिलबीले ( रुग्ण सेवा ), हिंदवी स्वराज्य आर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश मोरे ( सहकार ),आर.के.मोबाईल शाँपीचे रियाज काझी ( उद्योजक ) यांना माजलगाव भुषण पुरस्कार जाहीर झाले असुन मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे वितरण लवकरच मुकनायक दिनी विविध नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती माजलगाव जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार तथा संपादक प्रदिप कुलकर्णी,एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्योतिराम पाढंरपोटे,उपध्याक्ष बाळासाहेब आडागळे,संघटक विजय कापसे,पत्रकार राजेभाऊ पाष्टे,पत्रकार नय्युम आत्तार,पत्रकार वसंत परसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.