उपसरपंच पदाच्या निवडीतही माजी मंत्री क्षीरसागर गटाची सरशी

0
108

उपसरपंच पदाच्या निवडीतही माजी मंत्री क्षीरसागर गटाची सरशी…

बीड दि.30 (प्रतिनिधी) – बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाने 70 च्या वर ग्रामपंचायतवर सरपंच पदाचे उमेदवार आणि सदस्य निवडून आल्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडीतही चांगलेच यश मिळवले आहे. आज झालेल्या निवडीत 14 ग्रामपंचायतवर उपसरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे सरपंच पदाचे उमेदवार 71 ठिकाणी निवडून आले. या निवडणूकीच्यावेळी सदस्य म्हणूनही उमेदवार निवडून आले आहेत. काल आणि आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत देखील माजी मंत्री क्षीरसागर गटाने सरशी केली आहे. आज झालेल्या निवडीत चौसाळा – अंकुश कळासे, रौळसगाव – गितांजली गोरख मोरे, अंजनवती – मोरे कृष्णा रामदास, तांदळवाडी घाट – महादेव खोसे, राजुरी सर्कलमध्ये साक्षाळपिंप्री – काशिद अंकुश ज्ञानोबा, अव्वलपूर-सोनगाव – सपकाळ च्रंदकांत, बहादरपूर – कोळेकर अनिता विशाल, कुमशी – काशिद वंदना विनोद, कांबी – सोमेश्‍वर रहाडे, मुर्शदपूर – सरला अंगद जावळे, बहीरवाडी सर्कलमध्ये माळापुरी – बेब समीर कदीर, नागापूर – आसेफाबी शफिक पठाण, नामलगाव – महानंदा अर्जुन सावंत तर शिरूर तालुक्यातील पौंडूळ – प्रतिभा बापूसाहेब मराडे, हाजीपूर – ऋषिकेश विठ्ठल उगले यांच्या निवडी आज जाहीर झाल्या आहेत. उपसरंपच पदाच्या निवडीतही माजी मंत्री क्षीरसागर गटाचे उमेदवार निवडून आल्यामुळे ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here