इन्स्पायर कोचिंग क्लासेस यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

0
168

इन्स्पायर कोचिंग क्लासेस यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न..

माजी आमदार सय्यद  सलीम,  यांच्या अध्यक्षतेत व एम.आय.एम चे जिल्हा अध्यक्ष शेख शफिक़ भाऊ, यांच्या उपस्थितीत..

बीड/ प्रतिनिधी/आज बीड शहरात डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे सालाबाद प्रमाणे या ही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

आज पार पडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्या मध्ये प्रमुख पाहुणे माजी आमदार सय्यद जी सलीम, एम.आय.एम चे जिल्हा अध्यक्ष शेख शफिक़ भाऊ, सर सय्यद शाळेचे सचिव अब्दुल वकील सर, मिल्लत शाळेचे सचिव उमेर सलीम सर, जय हिंद कॅम्पस चे सचिव निजाम शेठ, तुलसी इंग्लिश स्कूलचे सचिव रोडे सर, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर पवार सर, फॉरेस्ट ऑफिसर ससाने मॅडम, सहशिक्षिका सलमा बाजी, इमरान इनामदार, मुझफ्फर इनामदार, इन्स्पायर कोचिंग चे डायरेक्टर अरफात सर उपस्थित होते.

या कार्यक्रमात चित्रकलेचे बक्षीस मध्ये दोन ग्रुप साठी प्रथम, द्वितीय, तृतीय, सायकल स्टडी चेअर व ड्रॉइंग किट होते. काजी मुजीब रहमान सर नॅशनल उर्दू शाळेतील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व सर्व आदर्श शिक्षकांना सर्टिफिकेट व ट्रॉफी देण्यात आली. यावेळेस कोचिंग चे डायरेक्टर यांनी सांगितले की शिक्षण हे काळाची गरज आहे, सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. कॉम्पिटिशनचा रिझल्ट मुकरम सर आणि अमर सर यांनी काढले

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here