आर्यन थिगळे राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेकरिता निवड..
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा कार्यालय. औरंगाबाद
औरंगाबाद /प्रतिनिधी/औरंगाबाद जिल्हा शहर किक बॉक्सिंग संघटना यांच्या तांत्रिकी मार्गदर्शनाखाली आयोजित विभाग स्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा दिनांक 29 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे विभागीय स्पर्धा संपन्न झाल्या
या स्पर्धामध्ये जिल्हा व शहर कराटे -डाे असोसिएशनच्या वतीने चार खेळाडू ने विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये आर्यन थिगळे याने वयोगट 14 वर्षाआतील 57 किलो वजन गटामध्ये आपला प्रति स्पर्धक बीड विरुद्ध हिंगोली हिंगोलीच्या फायटर ला मात करत रोपे गोल्ड मेडल पदक प्राप्त केले तसेच अर्जुन थिगळे याने 63 किलो वजन गटामध्ये रजत पदक प्राप्त केले तसेच 19 वर्षातील ऋषिकेश बेद्रे 48 किलो वजन गटांमध्ये रजत पदक व तसेच प्रशांत उपळकर याने 65 किलो वजन गटांमध्ये रजत पदक मिळवले
वरील खेळाडूंना प्रशिक्षक उत्तरेश्वर सपाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले वरील खेळाडू स्टेडियम बीड या ठिकाणी उत्तरेश्वर सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत अहमदनगर या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आर्यन थिगळे ने आपले स्थान निश्चित केले आहे या कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले डॉक्टर नितीन सोनवणे यांनी पण शुभेच्छा दिल्या खेळाडूंचे विविध स्तरावरती कौतुक होत आहे