पोलीस पाटील संघटनेकडून माजीमंत्री क्षीरसागर यांचे आभार

0
124

पोलीस पाटील संघटनेकडून माजीमंत्री क्षीरसागर यांचे आभार..

बीड दि.2 (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात पोलीस पाटलांच्या 1600 रिक्त जागा असून त्यापैकी 134 पोलीस पाटील कार्यरत आहेत ही बाब पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन याबाबतीत आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती केली होती

त्यानुसार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या जागा तात्काळ भरण्याची आग्रही मागणी केली त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जागा भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू केली असून पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील दादा पाटील काळभोर बीड जिल्हा अध्यक्ष अंगद मोरे पाटील पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जयसिंग भंडारे पाटील नानासाहेब काकडे पाटील बेदरकर पाटील शिवशंकर शिंदे श्रीकृष्ण सोळुंके अंगद गोरे यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले आहेत येत्या तीन महिन्यात पोलीस पाटील पदांच्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here