पद्यश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक क्रीडा स्पर्धा 2023 संपन्न..
नाशिक जिल्हास्तरीय भव्य़ क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धांचे उदघाटन
नाशिक, प्रतिनिधी/ युसुफ पठाण/ के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज,भाऊसाहेबनगर येथील भव्य मैदानावर पद्यश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक क्रीडा स्पर्धांचे उदघाटन उत्साहात झाले.
के.के.वाघ शिक्षण संस्था आणि स्माईल व स्पिनॅच सेवाभावी संस्था यांच्या सयुंक्त़ विद्यमाने पद्यश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक क्रीडा स्पर्धा 2023 अंतर्गत नाशिक जिल्हास्तरीय भव्य़ क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धांचे उदघाटन मा.श्री.राजेश लेले (नि.डेप्य़ु.जन.मॅनेजर, प्रशासन व क्रीडा, आय.ओ.सी.लिमिटेड) व कार्यक्रमाचे अध्य़क्ष स्माईल व स्पिनॅच संस्थेचे सचिव मा.श्री.अजिंक्य़दादा बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
पद्यश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक स्पर्धा अंतर्गत फुटबॉल,कुस्ती, बुदधीबळ,तलवारबाजी,स्क्वॅश व रस्सीखेच हया जिल्हास्तरीय खुल्या क्रीडास्प़र्धा व क्रिकेट, खो-खो, कबडडी, व हॉलीबॉल हया निफाड, सिन्ऩर, दिंडोरी, चांदवड, व येवला तालुका मर्यादीत खुल्या क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मा.श्री.राजेश लेले यांनी विद्यार्थ्याना खेळांचे महत्व़ व खेळामुळे आपले आरोग्य़ कसे निरोगी राहु शकते त्याच बरोबर मन स्थिर राहुन प्रत्येक समस्येला सामोरे जाऊ शकतो.तसेच खेळाडुंना चांगल्या सरावाच्या जोरावर राज्य़स्तरीय त्याचबरोबर देशासाठी खेळण्याची संधी स्मृती चषक स्पर्धा मार्फत उपलव्ध़ होऊ शकते.असे विचार मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र धिवर यांनी केले
तसेच प्रमुख पाहुण्यांचा परीचय क्रीडाविभागप्रमुख श्री.गोविंद कांदळकर यांनी केले. तर पद्यश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक स्पर्धा विषयी तसेच खेळांचे महत्व़ विषयी आपले मनोगत मा.श्री.अजिंक्य़दादा बाळासाहेब वाघ यांनी व्य़क्त़ केले.आभारप्रदर्शन मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला तासकर यांनी केले,
उदघाटन कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून उपमुख्याध्यापक श्री.अशोक बस्ते ,पर्यवेक्षक श्री.संजय वाघ, क्रीडाविभागप्रमुख श्री.गोविंद कांदळकर सर,क्रीडाशिक्षक श्री.धनंजय मोरे ,श्री.सागर डोखळे,श्री समीर शेख सर आदी शिक्षक शिक्षकेत्त़र कर्मचारी व खेळाडू, यांनी परीश्रम घेतले.