भाजप कार्यकर्त्यांचा मा.आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

0
99

दुधगाव ता.जिंतूर येथे भाजपला मोठे खिंडार..

भाजप कार्यकर्त्यांचा मा.आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

 

जिंतूर/प्रतिनिधि/माबुद खान/जिंतूर  मौजे दुधगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मा.आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला.

त्या मुळे मौजे दुधगाव येथे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजप पक्षाचे ध्येयधोरणे, पक्षातील गटबाजी, विकास कामे होत नाहीत, तसेच नागरिकांचे कामे होत नसल्याने भाजपला कंटाळून दुधगाव येथील ७० प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

त्यात हरिभाऊ राऊत, सुगाजी गरगडे, संजयराव पारवे, सर्जेराव राऊत, प्रसादराव राऊत, पंडितराव परवे, रामराव राऊत, बाळासाहेब राऊत, आनंदराव राऊत, हंबर उफाडे, मनोज राऊत, संतोष पारवे, जगन्नाथ गारुडी, संजय गारुडी, भागवत काळे, मारुती भवाळ, शंकर बोराडे, रवी उफाडे, हनुमान राऊत, सदाशिव पारवे, गोविंद पारवे, नवनाथ पारवे, बबलू पुंड, ज्ञानेश्वर काळे, भागवत मुळे, दशरथ पारवे, मोहन भवाळ, भगवान राऊत, आनंतराव राऊत, विलास भांडे, पप्पू आव्हाड, नितीन उफाडे, प्रवीण राऊत, राम मुळे, सतीश काळे, गोपाळ गारुडी, नारायणराव राऊत, अभिलाष राऊत, योगेश राऊत, माऊली राऊत, सचिन विश्वनाथ राऊत, निखील राऊत, शिवाजी गारुडी, नवनाथ जाधव, गणेश राऊत, सुदर्शन राऊत, पप्पू आव्हाड इत्यादीनी मा.आ.विजय भांबळे यांच्या उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय, येलदरी रोड जिंतूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

या वेळी मा.आ.विजय भांबळे यांनी सर्वांचे हार व पक्षाचे रुमाल घालून पक्षात स्वागत केले.
यावेळी उपस्थित अजयराव चौधरी, प्रसादराव बुधवंत, रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड, अभिनय राऊत, मनोज थिटे पाटील, गणेशराव ईलग, सुरेश राऊत, सचिन राऊत, उद्धवराव देशमुख, विठ्ठल मुटकुळे, श्याम सारंग, सचिन बोबडे, करून नागरे, शंकर माने, आंगद देशमुख, रोहिदास राऊत, विशाल चोपडे, बबलू कदम इ. उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here