अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार,तर एकजण जखमी

0
122

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार,तर एकजण जखमी

 

जिंतूर ,प्रतिनिधि/माबुद खान/जिंतूर तालुक्यातील दगडचोप पाटीजवळ अज्ञात वाहनाची व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सासरा ठार झाला असून जावायाच्या पायाला दुखापत झाली.

 

जिंतूर तालुक्यातील कवडा येथील ज्ञानेश्वर अंबादास चव्हाण (वय ३५) हे पाथरी येथे एका कार्यक्रमास गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ऊसतोडीसाठी गेलेले जावई बाळू माणिक राठोड (वय २५, रा. कवडा) यांना गावाकडे दुचाकी क्रमांक (एम. एच २२ ए.एक्स ०८२०) वर घेऊन येत होते.

दरम्यान, समोरून येणाऱ्या अज्ञात वाहन व मोटारसायकल यांच्यात दगडचोप- मोळा दरम्यान समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकी रोडच्या खाली एका खड्ड्यात जावून कोसळली. या अपघातातील जखमींना जालना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी ज्ञानेश्वर अंबादास चव्हाण यास तपासून मृत झाल्याचे घोषीत केले तर बाळू माणिक राठोड यांचा पाय फॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले.याबाबत चारठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here