अंबाजोगाई न प च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावत शहराची स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची प्रयत्न यशस्वी
रोजंदारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे हक्काचे मानधन मिळाल्याने पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेतले..
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- आरेफ सिद्दिकी
मागील तेरा ते चौदा महिन्यापूर्वी अंबाजोगाई नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येऊन नगर परिषदेचा प्रशासक म्हणून मुख्याधिकारी हे कार्यभार सांभाळत आहेत. अंबाजोगाई नगर परिषद येथिल रोजंदारी कर्मचारी यांनी त्यांना दोन महिन्यांपासूनचे वेतन न मिळाल्याने काम बंद आंदोलन केले होते . मात्र या आंदोलनात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला.व कामगारांचे आंदोलन संपवल्याच्या वावड्या उठवल्या. मात्र प्रत्यक्षात एकही रोजंदारी कामगार कामावर हजर झाला नाही .
या वरून काहीही काम न करता न झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले.
रोजंदारी कामगाराचे नेते व प्रहार संघटनेचे नेते अशोक गंडले यांनी आपल्या कर्मचारी बांधवांची बाजू भक्कम पणे लावून धरत फुकटचे श्रेय घेणाऱ्या स चाप बसविला . जोपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही तोपर्यंत कुठलाही कर्मचारी कामावर येणार नाही अशी भूमिका अशोक गंडले यांनी लावून धरली होती .त्यात ते यशस्वी झाल्याचे आज दिसून आले .गेली तेरा चौदा महिन्यापासून अंबाजोगाई नगर परिषदेच्या कामात कसलाही संबंध नसतांना देखील आज रोजंदारी कर्मचारी व त्यांचे नेते आणि प्रशासनात व कंत्राटदार यांच्यात समनवय घडवत केवळ अंबाजोगाई शहरातील नागरिकांचा विचार करून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी स्वतः मध्यस्थी करत रोजंदारी कर्मचारी बांधवाना त्यांचे थकलेले मानधन देऊ केले .
या अगोदरही प्रशासकाच्या काळामध्येच तीन ते चार वेळा कर्मचाऱ्यांच्या मानधाणासाठी मध्यस्थी करून त्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावला होता मात्र अशा गोष्टींचे श्रेय राजकिशोर मोदींनी कधीही घेण्याचा प्रयत्न केला नाही.
कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन मिळवून देऊन देखील त्यांना त्या गोष्टीचे श्रेय घेण्यात कसलाही रस नसल्याचे दिसून आले . केवळ अंबाजोगाई करांचे आरोग्य , शहराची स्वच्छता तसेच शहरामध्ये कसलाही वाद विवाद होऊ नये यासाठीच राजकिशोर मोदी यांनी ही शिष्ठाई केल्याचे दिसून आले. तसेच यापुढेही आपण अंबाजोगाई शहर व शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची भूमिका देखील यावेळी मांडल्याचे समोर आले आहे. केलेल्या किंवा न केलेल्या कामाचे श्रेय कोणीही घेवोत आपण मात्र अंबाजोगाई करांची निस्वार्थी पणे सेवा करतच राहणार असल्याचीराजकिशोर मोदी यांची भावना आजच्या कर्मचारी बांधवांच्या समाधानावरून दिसुन आली . रोजंदारी कर्मचारी बांधवांचे मानधन मिळाल्याने आपण लागलीच दैनंदिन कामावर हजर होणार असल्याचे सर्व कर्मचारी बांधव व त्यांचे नेते अशोक गंडले यांच्याकडुन सांगण्यात आले .
आज सकाळपासून सर्व कर्मचारी कामावर रुजू झाल्याने अंबाजोगाई शहर व परिसर पुन्हा स्वछ व समृद्ध होणार आहे याबाबत अंबाजोगाई करांनी समाधान व्यक्त केले आहे व अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये प्रशासक असताना देखील राजकिशोर मोदी यांनी केवळ अंबाजोगाई करांसाठी प्रशासनात हस्तक्षेप करत रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून दिला.