” प्रतिभा विकसित करण्याकरिता रासेयोजना उपयुक्त मंच “- डॉ करीम सालार यांचे प्रतिपादन
इकरा थीमच्या विशेष शिबिराचे उद्घाटन संपन्न
जळगाव दि.17/1- आजच्या मोबाईल गॅझेट मध्ये गुरफटलेल्या तरुणाईला राष्ट्रीय सेवा योजना समाजसेवेचे प्रशिक्षण संस्कार देऊन त्यांचे जीवन सार्थक बनवीत आहे. विद्यार्थ्यांची प्रतिभा विकसित करण्याकरता राष्ट्रीय सेवा योजना उपयुक्त मंच आहे असे प्रतिपादन नशिराबाद येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक 1मध्ये इकरा एच जे थीम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. करीम सालार यांनी केले.
दि. 17 ते 23 जानेवारी, 2023 दरम्यान संपन्न होत असलेल्या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनाच्या विशेष शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. करीम सालार होते तर शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सेनानी यांच्या पत्नी स्वर्गीय लालसिंग पवार यांच्या पत्नी दगूबाई व त्यांचे पुत्र रतन लालसिंग पवार यांच्या शुभहस्ते द्वीप प्रज्वलनाने करण्यात आला.
कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ इकबाल शाह, नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख तर मुख्याध्यापक मसूद शेख यांनीही मार्गदर्शन केले तर केंद्रप्रमुख अफशा मॅडम, मुख्याध्यापक जफर शेख ,जहीर खान ,वकार सिद्दिकी ,नफीस शेख, आरिफ शेख तसेच प्राचार्य पिंजारी आय एम डॉ युसूफ पटेल यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ राजू गवरे यांनी तर आभार डॉ तनवीर खान यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर राजेश भामरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रम अधिकारी डॉ राजू गवरे ,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. तनवीर खान, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ शबाना खाटीक तसेच डॉ हाफिज शेख, डॉ चांद खान ,डॉ. वकार शेख यांनीही परिश्रम घेतले. नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन यांनीही मार्गदर्शन करताना म्हटले की सामाजिक बांधिलकी ,सामाजिक भान वरिष्ठांकडून नवीन पिढीला हस्तांतरित करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे .भौतिकवादी चंगळवादी आत्मकेंद्रित समाजाला सेवेचा आदर्श राष्ट्रीय सेवा योजना देते . समाजापुढे आत्मकेंद्रिय जीवनशैलीचे मोठे आव्हान आहे .सात दिवसीय शिबिरात श्रमदान, स्वच्छता अभियान ,प्रबोधनात्मक रॅली इ. उपक्रम तसेच बौद्धिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.